Corona did not invite applications for several awards, including the Shivchhatrapati award 
कोल्हापूर

कोरोनामुळे शिवछत्रपती पुरस्कारासह  अनेक पुरस्कारांसाठी अर्ज मागविले नाही 

सुयोग घाटगे

कोल्हापूर : क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या गुणी खेळाडू , प्रशिक्षक , संघटक, कार्यकर्त्यांना शिवछत्रपती हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात येतो. यंदा या पुरस्कारांत खंड पडला असून या पुरस्कारासाठी पद्धतीने अर्ज मागवलेले नाहीत.

या पुरस्करांतर्गत दादोजी कोंडदेव, जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला) आणि एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार (अपंग खेळाडू) असे आणखी तीन राज्य क्रीडा पुरस्कार पात्र व्यक्तींना देण्यात येतात. मात्र कोरोनाचे कारण पुढे करत यंदा पुरस्करांबाबत शासनाने उदासीनता दाखवली आहे. हे पुरस्कार निव्वळ वर्षाच्या कामागगिरीच्या मुल्यमापनावरुन दिले जात नसल्याने कोरोना कालावधीत न झालेल्या क्रीडा स्पर्धांचे कारण देणे सोईचे नाही. या पुरस्कारासाठी 30 जून रोजी संपणारे वर्ष धरून त्या पूर्वीच्या पाच वर्षांपैकी तीन वर्षांतील खेळांडूनी केलेल्या कामगिरीचे मुल्यमापन केले जाते. राज्यातील खेळाचा दर्जा वाढवणे आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे नाव उंचावण्यासाठी प्रेरित करण्याची भावना या पुरस्कारामागे आहे. या पुरस्कारामुळे खेळाडूंना आणखीन प्रेरणा मिळत असून अतिउच्चतंम कामगिरी करण्याची अधिक उमेद मिळते मात्र शासनाच्या क्रीडा धोरणाबद्दल असणाऱ्या उदासीनतेमुळे यंदाचा शिवछत्रपती पुरस्कारापासून क्रीडा क्षेत्रात झटणाऱ्याना वंचित राहावे लागले आहे. 

असे आहेत पुरस्कार 
*जीवन गौरव पुरस्कार 
* शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू,संघटक) 
*उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार 
*जिजामाता पुरस्कार 
*एकलव्य क्रीडा पुरस्कार (अपंग खेळाडू) 
*जिल्हा क्रीडा पुरस्कार (गुणवंत खेळाडू, कार्यकर्ता, मार्गदर्शक) 

यंदा शासनातर्फे पुरस्कारासाठी अर्जाबाबत कोणत्याही सूचना जिल्हा क्रीडा कार्यालयाला आल्या नाहीत. या पुरस्कारासाठी नोव्हेंबर,डिसेंबरमध्येच अर्ज मागवले जातात. या अर्जांवर निवड समिती, क्रीडांचे प्रकार, पुरस्कर्त्यांची निवड,गुणांकन या नुसार अंतिम निर्णय होतो. मात्र ही प्रक्रिया यंदा राबवलेली नाही. 
- डॉ.चंद्रशेखर साखरे, जिल्हा क्रीडा अधिकारी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule 2026 : आता २ हजारांवरील पेमेंटवर शुल्क; पेट्रोल अन् ट्रेन तिकीटासाठी किती चार्ज लागणार?

Rainfall Forecast Maharashtra : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? हवामान विभागाचा पुढील अंदाज चिंताजनक

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2026

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

SCROLL FOR NEXT