corona effect on bengali community 
कोल्हापूर

होय! बंगाली समाज सावरतोय!

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - पश्‍चिम बंगालमधील भौगोलिक व आर्थिक परिस्थितीमुळे तेथील मजूर राज्याच्या कानाकोपऱ्यात पोचले असून त्या त्या ठिकाणच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याचे काम करतात. लॉकडाउनचा मोठा फटका त्यांनाही बसला. जसे सर्व व्यवहार सुरळीत होऊ लागले आहेत तसा हा समाजही हळूहळू सावरू लागला आहे. मात्र, लॉकडाउनच्या काळात मूळ गावी परत गेलेले निम्म्याहून अधिक मजूर अद्याप परतलेले नाहीत. या पार्श्‍वभूमीवर या समाजाचा नवरात्रोत्सव यंदा अगदी साध्या पध्दतीने साजरा होणार आहे. 

जिल्ह्यात बंगाली मजुरांची संख्या पस्तीस हजारांवर आहे. शहरातील गुजरी परिसरात बंगालहून आलेल्या कारागिरांची संख्या मोठी असून आता त्यांची कुटुंबेही येथे स्थायिक झाली आहेत. येथील कारागिरांनी मिळून एकवीस वर्षांपूर्वी येथे दुर्गा उत्सवाला प्रारंभ केला. उत्सवापूर्वी पंधरा दिवस अगोदर कोलकात्याहून गंगा नदीतील माती घेऊन मूर्तिकार येथे येतात. मूर्ती साकारून पुन्हा परत जातात. उत्सवापूर्वी दोन दिवस अगोदर ते पुन्हा येतात आणि मूर्तीची रंगरंगोटी व उत्सवाची सर्व तयारी करतात. मात्र, यंदा केवळ परंपरा जपायची म्हणून मूर्ती प्रतिष्ठापना होणार असून उत्सव काळात केवळ धार्मिक विधी होणार आहेत.  

 बंगाली समाजाच्या वतीने शहरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, यंदा कोरोनामुळे मोजक्‍याच लोकांच्या उपस्थितीत केवळ धार्मिक विधी होतील. कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल. 

- इंद्रजित सामंत

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT