corona effect on family in rural area is good 
कोल्हापूर

कोरोनाने एक चांगलचं झालं ; गावोगावी उजळतंय असं हे घराचं घरपण...!

रमजान कराडे

नानीबाई चिखली (कोल्हापूर) - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे वेगाने धावणाऱ्या जगाला जणू ब्रेक लागलेला दिसतो आहे. बेफामपणे धावणारी सगळीच माणसं थबकली आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून आपला गाव, आपली माणसं, आपली नाती या सर्वांपासून दुरावलेली मंडळी गेल्या कांही दिवसांपासून आपापल्या घरी परतलेली आहेत. या सर्वांमधून होत असलेला संवाद, नात्यांची होत असलेली नव्याने ओळख व घराला मिळत असलेले घरपण यानिमित्ताने पाहायला मिळत आहे. 

हे सर्व सुरू आहे ते सर्वांनाच प्रचंड वेदनादायी ठरलेल्या कोरोणामुळे. हे जरी चांगलं घडत असले तरी कोरोणाचा प्रभाव लवकरात लवकर कमी होऊन संपूर्ण जनजीवन परत पूर्वपदावर यावं अशीच सर्वांची इच्छा आहे. पण तरीही जगाचे, समाजाचे बदललेलं हे रूप पाहायला मिळाले ते मात्र निश्चितपणे आत्मचिंतन करायला लावणार असेचआहे. 

'खेड्यामध्ये घर ते कसले कौलारू, त्या चार भिंतींमध्ये असे मायेचा उजाळा' ग. दि. माडगूळकर यांनी म्हटल्याप्रमाणे खेड्यातील मायेची ही घरे. मात्र काळ बदलत गेला अन् खेड्यातील घराचं महत्त्व कमी होत गेले. जो तो शहराकडे वळला. येथेच राहू लागला.यातून त्यांना गावकऱ्यांचा तसेच कुटुंबाचा विसर पडलेला होता. शिवाय गावाकडील असलेल्या घरातल्या उंबरठ्यावरची भक्ती देखील त्यांची कमी झाली होती. 

मात्र आता हीच मंडळी गावाकडे आलेली आहेत. रजा मिळत नाही, कामाचा लोड आहे, टार्गेट पूर्ण करायचे आहे. अशी कारणे सांगणारी माणसं आता सरळ झालेली पाहायला मिळत आहेत. आपला गाव, आपली माणसे शेवटी महत्त्वाची आहेत याची जाणीव त्यांना यानिमित्ताने झालेली आहे. घरातील सर्व सदस्य एकाच ठिकाणी बसून एकाच विषयावर चर्चा करताना त्यांच्यातील होत असलेला संवाद नात्याचे महत्त्व अधोरेखीत करणारा दिसत आहे. 

आपण प्रगतीच्या कितीही गप्पा मारल्या तरी निसर्गासमोर आपण हतबल आहोत हे पुन्हा एकदा सिध्द झाले. त्यामुळे कोरोना संपला म्हणजे विषय संपला असे म्हणून पुन्हा कार्यरत  होणाऱ्या माणसाने काही बाबींचा बोध घेणे अपेक्षित आहे. जात, धर्म, पंत, सीमा या मानवी कल्पनेतून साकारलेल्या गोष्टी एका क्षणात कशा उध्वस्त झाल्या याचा देखील अनुभव याकारणाने आपण घेतला. येणाऱ्या काळात याबाबींना किती महत्त्व द्यायचे हे शहाणपणाने ठरवणे अपेक्षित आहे. ही ठेच कदाचित माणसाच्या भविष्यातील प्रवासासाठी निश्चितपणे उपयोगी पडेल याची खात्री वाटते. कोरोनाचे संकट दूर होईल सर्वांनी एकीने त्यावर विजय मिळवूया.पण भविष्यात असे संकट येणार नाही अशा तोऱ्यात मात्र वावरने बंद करूया.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तान UAE ला पराभूत करत 'सुपर फोर'मध्ये! भारताविरुद्ध पुन्हा होणार सामना, पण कधी अन् केव्हा? जाणून घ्या

Athletics Championship 2025: नीरज चोप्रा विरुद्ध अर्शद नदीम लढत होणार! जाणून घ्या कुठे अन् किती वाजता पाहाता येणार फायनल

PAK vs UAE: पाकिस्तानी विकेटकिपरच्या थ्रोमुळे अंपायरला मोठी दुखापत, मैदानंच सोडावं लागलं; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

SCROLL FOR NEXT