corona effect on farmers in jayshingpur 
कोल्हापूर

कोरोनाचा शेतकऱ्यांना झटका ; मागणी नसल्याने भाजीपाला शेतातच विस्कटून टाकण्याची आली वेळ...  

सकाळ वृत्तसेवा

जयसिंगपूर - कोरोना संक्रमणामुळे सध्या सर्वानाच फटका बसत आहे. यातून शेतकरी तरी कसा सुटेल? याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. भाजीपाल्याला मागणी नाही, दर नाही यामुळे हेरवाड (ता. शिरोळ) येथील शेतकरी सुकुमार पाटील यांच्यावर तीन टन ढबू मिरची चक्क शेतात विस्कटून टाकण्याची वेळ आली. यात त्यांचे सुमारे अडीच लाखाचे नुकसान झाले. 

१४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे पिकवलेला ढबू शेतातच सडत आहे. हेरवाडच्या सुकूमार पाटील यांच्या एक एकरातील ३ टन ढबू फेकून देण्यात आले असून यामध्ये त्यांचे सुमारे अडीच लाखाचे नुकसान झाले. कोरोनामुळे सर्वच व्यवसायाना फटका बसत आहे. यामध्ये शेतकरीही सापडला असून कोरोनाच्या संकटात आता शेतकरीही भरडला जात आहे. 

पाटील यांनी प्रवीराम कृषी अॅग्रो कामेरी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या एक एकर शेतामध्ये ढबूची लागण केली होती. यासाठी त्यांनी नांगरणी, औषध फवारणी यासह विविध कामांसाठी मोठा खर्च केला आहे. मात्र, दर्जेदार ढबू लागल्यानंतर कोरोनाच्या संक्रमणाने अख्या जगात हाहाकार माजविला आहे. लॉकडाऊनमुळे भाजीपाल्याची आयात-निर्यात थांबली. 

पाटील यांनी आपल्या शेतातील ढबू गावातील ग्रामस्थांना मोफत दिली. गेल्या अनेक दिवसापासून ढबूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत होते. मात्र, बाजारपेठ नसल्याने दर्जेदार तयार झालेला ढबू आपल्याच शेतात विस्कटण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यांनी ट्रॅक्टर ट्रॉलीच्या माध्यमातून सुमारे तीन टन ढबू आपल्या शेतात विस्कटले. याबाबत बोलताना सुकूमार पाटील म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठे नुकसान झाले आहे. तरीही कोरोनाच्या लढ्यासाठी मागे हटणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT