corona effect on Jotiba mountain rain tourism kolhapur 
कोल्हापूर

जोतिबा डोंगरावर वर्षा पर्यटनासाठी 'हे' खास पाॅईंट पण यंदा कोरोनाने प्लॅन फसला...

निवास मोटे

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) - जून महिना आला की जोतिबा डोंगर भागातील डोंगर-पठारे तसेच परिसरही हिरवागार होतो. डोंगरावर वाहणारे लहान-मोठे धबधबे ही प्रवाहित होतात. जोतिबा वरील वर्षा पर्यटन तसेच दख्खनचा राजा जोतिबा देवाचे दर्शन, निसर्ग दर्शन घेण्यासाठी डोंगरावर दरवर्षी असंख्य भाविक वर्षा पर्यटनाचा आनंद लुटतात. पण यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे २५ मार्च पासूनच जोतिबाचे मंदिर बंद आहे. तब्बल तीन महिने झाले तरी भाविक डोंगरावर आलेले नाहीत. यंदा पर्यटकांना व भाविकांना येथील निसर्ग पर्यटनाबरोबरच दख्खनच्या राजाचे दर्शन घेता आले नाही. परिणामी डोंगरावर पूजारी , दुकानदार, हॉटेल व्यावसाईक, व्यापारी वर्ग यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

 दक्षिण दरवाजा शुध्द हवेचे ठिकाण

ज्योतिबा डोंगर हे गाव उंच ठिकाणी वसलेले असून तेथे प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून जवळ असल्याने येथील पावसाळी वातावरण अगदी अनोखे असते. येथे सतत ढगाळ वातावरण, पावसाची रिपरिप, दाट धुके, बोचरी थंडी त्यामुळे येथील वातावरण भाविक व पर्यटकांना आकर्षित करते. त्यामुळे दरवर्षी येथील हिरवा गार निसर्ग, पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी हजारो भाविक डोंगरावर येतात. जोतिबा डोंगरावर वरून कोल्हापूर शहर, पन्हाळगड,वारणा परिसर पाहावयास मिळतो. उंच डोंगर पठारातून येणारे भाविक हा परिसर न्हाहाळताना दिसतात. जोतिबा डोंगरावर दक्षिण दरवाजा म्हणून एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी शुद्ध हवा येते. या ठिकाणी भाविक आवर्जून भेट देतात. शुध्द हवेचे ठिकाण म्हणून ते प्रसिद्ध आहे.

तीन महिने सूर्यप्रकाश दिसत नाही

दर रविवारी पायी येणारे भाविक क्षणभराच्या विश्रांतीसाठी या ठिकाणी थांबतात. कोल्हापूरच्या काही तज्ञांनी या शुद्ध हवेचे परीक्षण केलेले आहे. येथील गायमुख परिसरही पाहण्यासारखा आहे. येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे श्रीशैल मल्लिकार्जुन हे तीर्थक्षेत्र आहे. तसेच तेथे  गाईच्या आकाराचा गायमुख तलाव आहे. या ठिकाणी श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी नगरप्रदक्षिणा निघते. या ठिकाणस मोठे पारंपरिक महत्त्व आहे. जोतिबा मंदिर परिसराला तर नेहमी धुक्याची टोपी असते. या धुक्यातत अगदी जवळचे दिसत नाही. या ठिकाणी पावसाळ्यात तीन महिने सूर्यप्रकाश दिसत नाही. नेहमी धुक्याचे वातावरण असते. येथील हे वातावरण पुजारी ग्रामस्थ यांनाच सुट होते.

एखादा पर्यटक, भाविक आला तर तो आजारी पडतो त्यांना हे वातावरण सुट होत नाही. डोंगरावरील ही सद्य स्थिती आहे. दरम्यान,यंदा कोरोणाच्या संसर्गामुळे डोंगर शांत आहे. तीन महिने झाले डोंगरावर एक ही भाविक आलेला नाही.डोंगरावर अनेकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. ग्रामस्थ पुजारी कोरोना साथ कधी जाईल या प्रतिक्षेत आहेत .
 

जोतिबा वरील दाट धुके,थंडी, पाऊस, वारा यांचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी आम्ही जून महिन्यात वर्षा सहलीचा आनंद व ज्योतिबा देवाचे दर्शन घेण्यासाठी  डोंगरावर येतो. पण यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे जोतिबाचे मंदिर बंद आहे.त्यामुळे आम्ही वर्षा पर्यटनाला येऊ शकलो नाही. येथील पावसाळी वातावरण म्हणजे स्वर्गसुखाचा आनंद आहे. धुक्यात गोंदलेला डोंगर व वातावरण खरोखरच सुंदर असते - श्री.भानगिरे (जोतिबा भाविक) , पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: जय शाह - शाहिद आफ्रिदीने खरंच एकत्र बसून पाहिला IND vs PAK सामना? जाणून घ्या Viral Video मागील सत्य

रितेश देशमुखची शाळा पाहिलीत का? ना मुंबई, ना लातूर; 'या' ठिकाणी शिकलाय अभिनेता, मैदान पाहाल तर पाहतच राहाल

Latest Marathi News Updates : घनसावंगी शिवारातील पाझर तलाव फुटला

Sillod Rain : तीन तासाच्या पावसाने सर्वत्र दाणादाण; आमठाणा मंडळात 70 मिलिमीटर पाऊस, नऊ गावांचा काही तासासाठी तुटला संपर्क

UPI Cash Withdrawal: आता कॅशसाठी एटीएममध्ये जाण्याची गरज पडणार नाही, स्कॅन करताच रोख रक्कम हातात येईल, पण कसं?

SCROLL FOR NEXT