corona effect on shirol farmers and farming 
कोल्हापूर

कोरोनाचा असा हा फटका... दररोज 500 टन भाजीपाला शेतात पडून....

डी. आर. पाटील

शिरोळ - कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशामुळे, शिरोळ तालुक्‍यातील आठवडा बाजार बंद राहणार आहेत. आठवडे बाजार बंद राहिल्यामुळे स्थानिक बाजारपेठेत विक्री केला जाणारा भाजीपाला, तसेच मुंबईसाठी पाठवण्यात येणारा असा दररोज सुमारे 500 टन भाजीपाला शेतकऱ्यांच्या शेतात पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कोरोनाचा आर्थिक फटका बसला आहे. 

शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड

शिरोळ तालुक्‍याची ओळख ही भाजीपाला व ऊस पिकवणारा तालुका म्हणून आहे. तालुक्‍यामध्ये काकडी, कोबी, टोमॅटो, फलॉवर, वांगी, मोठया प्रमाणात पिकवले जातात. शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला हा कोल्हापूर, सांगली, मिरज, इचलकरंजी, कुरुंदवाड येथे होलसेल दरात भाजीविक्रेते विकत घेतात. येथे होणाऱ्या भाजीपाल्याच्या सौद्यांमध्ये शेतकऱ्यांना होलसेल विक्रेत्याला कमिशनही द्यावे लागते. स्थानिक बाजारपेठेशिवाय, मुंबई, अहमदाबादला शिरोळ तालुक्‍यातील भाजीपाला पाठवण्यासाठी नांदणी, कोथळी, दानोळी, उमळवाड येथे सहकारी तत्वावर चालवले जाणारे संघ आहेत. या संघाच्या माध्यमातून दररोज सुमारे 200 टन भाजीपाला पाठवला जातो. 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आठवडे बाजार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड, नांदणी, दत्तवाड, टाकळी, हरोली, शिरटी, अकिवाट आदी गावात भरणाऱ्या आठवडे बाजारावर गंडांतर आले आहे.

तसेच सांगली, मिरज, इचलकरंजी येथीलही बाजारपेठेत जाणारा भाजीपाला थांबला आहे. या स्थानिक आठवडा बाजारांमध्ये प्रतिदिन 300 टन भाजीपाला विक्री होतो. तसेच मुंबईला सुमारे 200 टन भाजीपाला पाठवला जातो. स्थानिक बाजारपेठेसह, मुंबईस जाणारा भाजीपाला बंद झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. भाजीपाला वेळच्यावेळी काढून बाजारपेठेत न पाठवल्यास खराब होण्याची शक्‍यता आहे. 

भाजीपाल्याचे दर पडलेले आहेत. मुंबईमध्ये पाठविण्यात येणाऱ्या भाजीपाल्यास अत्यल्प दर मिळत आहे. काकडी सात ते आठ रुपये किलो, कोबी दोन ते तीन रुपये किलो, टोमॅटो पाच रुपये किलो यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. तालुक्‍यातुन दोनशे टन भाजीपाला मुंबईला पाठविला जातो. आजअखेर प्रशासनाने सहकारी संघांना भाजीपाला न पाठविण्याबाबत सुचना आली नसली तरी, कोरोना व्हायरसमुळे भाजीपाल्याचे दर पडले आहेत. 
-शितल उळागड्डे, चेअरमन, नांदणी भाजीपाला संघ  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT