Corona has disrupted normal life of people
Corona has disrupted normal life of people 
कोल्हापूर

सीमा बंदीमुळे अशी झालीय पती - पत्नीची ताटातुट... 

सचिन निकम

लेंगरे (सांगली) - कोरोनामुळे सर्वसामान्य माणसाचे जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे.कोरोनाने कुटुंबातील अनेक लोकांची ताटातुट झाली आहे.सीमा बंदीमुळे कुटुंबातील पती - पत्नीची ताटातुट झाली.महाराष्ट्र,कर्नाटक राज्यातील संचारबंदीमुळे ते अडकून पडले.परिस्थिती निवळेल या आशेने चार दिवस कसे तर ढकलले.परंतु लॉकडाऊन वाढवल्याने आणखी किती अशी परिस्थिती राहणार याचा अंदाज लागत नसल्याने पत्नीला घरी कसे आणायचे हा प्रश्न पतीला पडला आहे.प्रशासनाकडून यासाठी कोणतेही पर्याय नसल्याचे सांगितले त्यामुळे दाद मागायची कुणाकडे प्रश्न पडला आहे.

परिसरातील अनेक लोक गलाई व्यावसाया निमित्त देशभर विखुरले आहे.त्यापैकीच हे देविखिंडीतील दोन मुले,पती पत्नी असा परिवार असणारे कुंटंब व्यावसायानिमित्त कर्नाटक राज्यातील आरबोड येथे स्थाईक आहे.करोना वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी अगोदर जिल्हा सिमा नंतर राज्याच्या सीमा बंद करण्यात आल्या.आरबोड येथील राहत असलेल्या कुटुंबातील पती एक मुलासह कामानिमित्त देविखिंडी गावी आले होते.तर पत्नीला एक लहान व्यवसाय असणार्या ठिकाणीच ठेवले.गावाकडील काम आटोपून लगेच व्यावसायाच्या ठिकाणी जाण्याच्या तयारीत असताना देशात संचार बंदी व लॉकडाऊन करण्यात आल्याने सगळेच ठप्प झाले. 

परराज्यात राहत असलेल्या पत्नीकडे जाण्यासाठी अथवा पत्नीला गावाकडे आणण्यासाठी प्रयत्न केले.परंतू हे प्रयत्न प्रशासनाच्या संचारबंदीपुढे फोल ठरले.पतीचे प्रयत्न फोल ठरत असल्याचे पाहून पत्नीने आरबोड येथील पोलिस निरिक्षक यांच्या परवानगीचे पत्र घेऊन गावी जाण्यासाठी प्रयत्न केले.परंतु कर्नाटकच्या सीमेवर आल्यानंतर हे परवानगीचे पत्र चालणार नाही.असे सांगत त्या एकट्या महिलेला,लहान मुलाला स्थानिक तहसीलदारांचे पत्र आणा असे सांगत सिमेवरून पोलिसांनी परत पाठविले.त्यामुळे पती पत्नी भेट होऊ शकली नाही.
   
गावाकडे असणार्या पतीने पत्नीकडे जाण्यासाठी प्रयत्न केले.परंतु प्रत्येक वेळी सिमा प्रश्न निर्माण झाला.गावातील अनेक लोक गावी येत आहेत.मग परराज्यात राहणार्या त्या एकट्या महिलेला का अडविले असा प्रश्न पतीला पडला आहे.लोकप्रतिनिधी एकीकडे मध्यप्रदेशात अडकलेल्यांना लोकप्रतिनिधी कडून प्रयत्न सुरु आहेत.या प्रमाणेच या पती पत्नीला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वाती मालीवाल प्रकरणात CM केजरीवाल अन् त्यांच्या पत्नीची चौकशी होणार, महिला आयोग आक्रमक!

Darjeeling Tea: किंमती वाढल्या पण निर्यात घटली; दार्जिलिंग चहा संकटात का आहे?

JEE Advanced Admit Card 2024 : जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी प्रवेशपत्र आज मिळणार; असे करा डाऊनलोड

Pakistan Espionage Case : पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी फरार मुख्य आरोपीला अटक; NIA ची कर्नाटकात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! पुण्यात कोयत्याने सपासप करुन तरुणाचा टोळक्याकडून खून

SCROLL FOR NEXT