corona infected of arrested accused in belgaum 
कोल्हापूर

ब्रेकिंग - सुपारी किलरला झाली कोरोनाची लागण 

अमृत वेताळ

बेळगाव - सुपारी किलर आणि खंडणी वसूली प्रकरणी खडेबाजार पोलिसांनी अटक केलेल्या दोघापैकी एकाला कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवार (ता. 9) निदान झाले आहे. त्याला महाराष्ट्र पोलिसांनी चौकशीसाठी दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत घेतले होते. त्यावेळी त्याचा स्वॅब घेण्यात आला होता.

चार दिवसापूर्वी पुन्हा त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली होती. आरोपीला कोरोनाची लागण झाल्याचे पुणे येथून आज दुपारी हिंडलगा कारागृह प्रशासनाला कळविण्यात आल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयातील कोरोना विभागात हलविण्यात आले. खबरदारी म्हणून कैद्यांच्या रँडम कोरोना तपासणीचे काम हाती घेण्यात आले आहे.

या आरोपीला व त्याच्या साथीदाराला  गेल्या महिन्यात  खडेबाजार पोलिसांनी अटक करून त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात केली होती. मात्र, तो आरोपी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खडेबाजार पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मुखेश जगन्नाथ कामते (रा. हुलबत्ते कॉलनी) यांना दोघांनी फोनवरून धमकी देत एक लाख रुपयांची खंडणी मागितली होती. त्यामुळे कामते यांनी या प्रकरणी 23 जानेवारी रोजी खडेबाजार पोलिसात फिर्याद दिली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल घेऊन 20 जून रोजी चिक्कनंदीहल्ली (ता. बैलहोंगल, सध्या रा. दुसरा क्रॉस शास्त्रीनगर) व त्याच्या सहकाऱ्याला अटक केली होती. त्यांच्याकडे शस्त्रे आणि वाहने जप्त केली होती. त्यांच्यावर यापूर्वी खडेबाजारसह, टिळकवाडी, कॅम्प, शहापूर आणि महाराष्ट्र ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, पुणे शहर डेक्कन पोलीस ठाण्यात देखील गंभीर स्वपरूपाचे गुन्हे दाखल आहेत. शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अभिजित भातकांडे या तरुणावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणात देखील त्याचा सहभाग होता. 

महाराष्ट्र पोलिसांनी आरोपीला पाच दिवसापूर्वी दोन दिवस पोलीस कोठडीत घेतले होते. त्यावेळी त्याचा स्वब घेण्यात आला होता. चौकशी झाल्यानंतर त्याला तीन दिवसापूर्वी पुन्हा कारागृहात पाठविण्यात आले. मात्र, त्याला कारागृहातील आयसोलेशन विभागात ठेवण्यात आले होते. आज दुपारी पुणे येथून हिंडलगा कारागृहाला या आरोपीला कोरोनाची लागण झाली असल्याचा फोन आला.  त्यामुळे सगळ्यांची तारांबळ उडाली. तातडीने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या पूर्वीच कॅम्प आणि काकती पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्याने पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. आता या प्रकरणात देखील खडेबाजार आणि महाराष्ट्र पोलिसांना देखील कॉरनटाइन होण्याची शक्यता आहे. खबरदारी म्हणून कारागृहातील कैद्यांची रँडम कोरोना तपासणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

हा आरोपी कारागृहात बंदीस्त असताना त्याच्या निकटवर्तीयांनी भेट घेतली आहे. तसेच त्याला बाहेरून जेवण देखील पुरविण्यात येत होते. त्यामुळे त्या सर्वांची आता धाकधूक वाढली असून त्यांना देखील क्वारंटाईन होण्याची शक्यता आहे. 

खडेबाजार पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला महाराष्ट्र पोलिसांनी दोन दिवस पोलिस कोठडीत घेतले होते. त्याठिकाणी त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. आज त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याची जिल्हा रुग्णालयात रवानगी करण्यात आली आहे.
-कृष्णकुमार, मुख्य अधीक्षक हिंडलगा कारागृह

संपादन - धनाजी सुर्वे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT