corona infected brother and sister are corona negative  
कोल्हापूर

कोल्हापुरातील ते बहिण - भाऊ झाले कोरोना मुक्त...

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - गेल्या तीन आठवड्यापासून भक्तीपूजा नगरात फिरकणे म्हणजे अनेकांच्या कपाळावर अठ्या पडायच्या. त्याला कारणही तसेच होते. शहरातील दोन पहिले कोरोनाबाधित रूग्ण या नगरातच सापडल्याने खळबळ उडाली होती. मात्र, हे दोन्हीही बहिण-भाऊ असलेले रूग्ण ठणठणीत बरे होवून आज दुपारी घरी परतले आणि त्यांच्या शेजाऱ्यांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले. विभागीय क्रीडा संकुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर या रूग्णांचा बंगला आहे. भाऊ पुण्याहून परतल्यानंतर त्याला कोरोना असल्याचे निदान झाले आणि त्याचदरम्यान बहिणीलाही लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

जिल्हा प्रशासनाने तत्काळ हा परिसर सील केला आणि खबरदारीचे उपाय केले. मात्र, या काळात परिसरातील लोकांचे दैनंदिन जगणे मुश्‍कील झाले होते. दरम्यान, दोघांवर यशस्वी उपचार झाले आणि आज दुपारी पाऊणच्या सुमारास त्यांचे घरी स्वागत झाले. "आम्ही मोठ्या संकटातून बाहेर पडलो. तुम्ही घरीच रहा, सुरक्षित रहा' असा संदेश त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT