corona infected patient Funeral at Panchganga Cemetery kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापुरात कोरोनाबाधिताचा 'तो' मृतदेह... स्मशानभूमीत ना नातेवाईक ना हुंदक्यांचा आवाज... सगळं काही भयाण...

सुधाकर काशिद

कोल्हापूर - अख्ख्या स्मशानभूमीत आज रात्री खऱ्या अर्थाने स्मशानशांतता. पंचगंगा स्मशानभूमीला येऊन मिळणारे दोन्ही मार्ग पोलिसांनी रोखलेले. स्मशानभूमीच्या शेडलाही पत्रे माणरलेले. स्मशानभूमीत फक्त पाच कर्मचारी व त्यांच्यासमोर प्लास्टिकच्या आवरणात बांधलेला कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह. सोबत कोणी नातेवाईक नाहीत, हार नाही, फूल नाही, हुंदका नाही अशा वातावरणात या कोरोना बाधित रुग्णावर आज रात्री अकरा वाजता पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानभूमीतील पाच कर्मचाऱ्यांनी मृतदेहाला नमस्कार करून अग्नी दिला आणि कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाला अखेरचा निरोप दिला.
कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या रुग्णावर आज रात्री पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. संसर्गापासून खबरदारी म्हणून स्मशानभूमीतील पाचही कर्मचाऱ्यांनी पी पी किट घातले होते. महापालिकेच्या शववाहिकेतून हा मृतदेह आणला. संसर्ग टाळण्यासाठी शववाहिकाच्या चालकालाही खाली उतरून देण्यात आले नाही. पीपी किट घालून पूर्ण खबरदारी घेतलेल्या स्मशानातील कर्मचाऱ्यांनी मृतदेह चितेवर ठेवला. मृताचे नातेवाईक सोबत नसल्याने आपलाच एक बांधव या भावनेने कर्मचाऱ्यांनी नमस्कार करून अखेरचा निरोप दिला. एरवी स्मशानभूमीत शांतता असतेच, पण आज या मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना इतकी खबरदारी घेण्यात आली होती की स्मशान शांततेचा एक वेगळाच अनुभव या साऱ्या परिसराने घेतला. कोरोना संसर्ग किती घातक आहे. मृत्यूनंतरही कसे विरान अनुभवावे लागते, हे आज पंचगंगा स्मशानभूमीत कोरोना रुग्णावर झालेल्या अंत्यसंस्काराच्या निमित्ताने दिसून आले.

अंत्यसंस्कारानंतर कर्मचाऱ्यांनी वापरलेले किटही जाळून टाकले. कोरोना रुग्णावर अंत्यसंस्कार करण्याची पंचगंगा स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांची आज पहिलीच वेळ होती. कर्मचारीही तणावाखाली होते. आरोग्य निरीक्षक अरविंद कांबळे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना अंत्यसंस्कारापूर्वी, अंत्यसंस्कारावेळी व अंत्यसंस्कारानंतर काय खबरदारी घ्यायची याच्या सूचना दिल्या व त्यानुसार अंत्यविधी करण्यात आला.

संसर्ग टाळणे आपल्या हातात

कोरोना संसर्ग अतिशय घातक आहे, मात्र कोरोना संसर्ग टाळणे आपल्या हातात आहे. यासाठी लॉकडाउन सोशल डिस्टन्सचे आवाहन करण्यात आले आहे, ते पाळले तर कोरोनाला आपण रोखू शकतो आणि हे टाळले नाही तर कोरोना आपल्याला येऊन भिडू शकतो आणि गुंतागुतींच्या स्थितीत मृत्यू अटळ असतो. आज कोरोना बाधित रुग्णाच्या अंत्यसंस्काराच्या निमित्ताने हे चित्र अधिक ठळक झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akshaya Tritiya Gold Price : अक्षय तृतीयेला सोन्याच्या भावाने गाठला उच्चांक, खरेदीही मोठ्या उत्साहात; २०,००० कोटींच्या विक्रीचा अंदाज

Record Broken! पंजाब किंग्सने नोंदवली IPL 2026 मधील सर्वोच्च धावसंख्या; प्रियांश आर्य, कूपर कॉनलीसह सारेच लखनौच्या गोलंदाजांवर तुटून पडले...

Crime: लॅबमध्ये बोलवलं; संधी मिळताच जवळ ओढून चुंबन घेतलं, नंतर...; शाळेतच महिला शिक्षिकेसोबत दुसऱ्या शिक्षकाचं विकृत कृत्य

DGCA उपसंचालकांना लाच प्रकरणात अटक, ड्रोन आयातीसाठी मागितले होते २.५ लाख

Latur Missing Kids Case: लातूर हादरलं! दोन चुलत भावंडं बेपत्ता; सहा वर्षीय देवांशचा मृतदेह सापडला, साईचरणचा अद्याप शोध सुरू

SCROLL FOR NEXT