corona infection for boy after he going school to home in kolhapur 
कोल्हापूर

धक्कादायक ; शाळेतून घरी गेला अन्‌ पॉझिटिव्ह झाला ; कसा घडला हा प्रकार

सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज : सात दिवसांपूर्वी तो पत्नी व मुलीसह मुंबईहून आला. त्याने थेट शेंद्री येथे स्वॅब दिला. त्यानंतर त्याला शाळेत ठेवले. सात दिवसांनंतर कालच (शुक्रवार) घरी क्वारंटाईन केले. आज पहाटे त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मुंबई ते कळवीकट्टे व्हाया शेंद्री असा त्या बाधित तरुणाचा प्रवास लोकांना चिंतेत टाकणारा ठरला आहे.

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तेरणी व बुगडीकट्टेपासून हाकेच्या अंतरावर आणि कर्नाटकातील हत्तरकीला खेटून असलेले कळवीकट्टे गाव. हा तरुण ३५ वर्षांचा आहे. तो, पत्नी व मुलगी आणि त्याच्यासोबत मित्राची तिघांची फॅमिली, अशा सहा जणांनी मुंबईतून प्रवास सुरू केला. १० मे रोजी ते थेट शेंद्री माळावरील वसतिगृहात तपासणीसाठी पोचले. तेथे स्वॅब घेतला. शेंद्रीतील विलगीकरण केंद्रात जागा नसल्याने त्यांना गावी पाठवून त्यांना शाळेत ठेवण्यास सांगितले. रिपोर्ट अजून आले नाहीत, तरीसुद्धा शाळा फुल्ल झाल्याने सात दिवसांच्या क्वारंटाईननंतर कालच घरी सोडले. तरुणाचे हत्तरकी रोडवर स्वतंत्र घर असल्याने तो कुटुंबासह तेथेच राहिला. आज सकाळी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला अन्‌ गावाला धक्काच बसला. आज सकाळपासूनच त्याच्याशी कितीजण संपर्कात आले, याची माहिती घेणे सुरू होते. कळवीकट्टेच्या रूपाने तालुक्‍यात पहिलाच रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. लोकांनी बाहेर पडू नये, अशा सूचना दिल्या आहेत.


शेजारधर्म पाळला...
हत्तरकी रोडवर या उच्चशिक्षित तरुणाचे घर आहे; परंतु, थोड्या अंतरावर काही घरे आहेत. त्यांनी जर शेजारधर्म पाळून त्यांच्याशी संपर्क केला असेल तर ते धोकादायक ठरू शकते. त्यांना जेवण अथवा अन्य मदतीसाठी नातेवाईक, मित्रमंडळी कोणी गेले होते का, याचीही विचारपूस सुरू आहे. 

त्याचा प्रवास नजरेत
१० मे रोजी आलेला हा तरुण शेंद्रीतून स्वॅब देऊन बाहेर पडल्यानंतर गावी जाईपर्यंत आणखी कोठे फिरला होता का, कळवीकट्टेत गेल्यानंतर तेथे कोणाशी संपर्क केला का? क्वारंटाईन झाल्यानंतर तो कुठे बाहेर पडला होता का?, मुंबईवरून येताना तपासणी नाक्‍यावर थेट संपर्क कोणाशी आला का? हे सर्व नजरेत आणण्यासाठी प्रशासन धडपडत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वनतारा'मध्ये घेऊन गेलेल्या 'महादेवी'ला परत आणण्यासाठी ताकदीने लढा; मुनिश्री आदित्यसागर यांचे राजू शेट्टी, प्रतीक पाटलांना आवाहन

Explained: तुम्हालाही जास्त अक्रोड खाण्याची सवय आहे का? मग होऊ शकतात 'हे' दुष्परिणाम

मुंबईत मुसळधार! ट्रॅकवर पाणी, लोकल ट्रेनचं वेळापत्रक कोलमडलं; अनेक भागात साचलं पाणी

Latest Marathi News Updates : पुण्यात पुढच्या तीन तासात अति मुसळधार पावसाची शक्यता

Showroom fire: 'साेलापूरातील सिद्धी सुझुकी अन्‌ बजाज शोरूमला भीषण आग'; धूर पाहून वॉचमनने दाखविली तत्परता, अंदाजे ३५ ते ४० लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT