Corona infection five employees who went to serve Best 
कोल्हापूर

बेस्टच्या सेवेसाठी गेलेल्या पाच कर्मचाऱ्यांना कोरोना 

सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज (कोल्हापूर) : मुंबई बेस्टच्या सेवेसाठी गेलेल्या येथील एसटी आगारातील पाच कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला. या सर्वांना शेंद्री माळावरील कोविड काळजी केंद्रात दाखल केले आहे. याशिवाय त्यांच्या संपर्कातील इतर कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत. 

वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार येथील एसटी आगारातील 42 कर्मचारी दीड महिन्यापूर्वी मुंबईला बेस्टच्या सेवेसाठी गेले होते. ही सेवा बजावून सर्व कर्मचारी काही दिवसापूर्वीच आगारात दाखल झाले. त्यावेळी येथील आगारातून मिळणाऱ्या वागणुकीबाबतही या कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. याशिवाय सर्व कर्मचाऱ्यांना अलगीकरणाचे पत्र दिले होते. त्याची रजा देण्याची सूचना कर्मचाऱ्यांना केली होती. त्यावर कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करून अलगीकरण कालावधीची रजा न मांडण्याची मागणी केली आहे. 

दरम्यान, 42 पैकी एका कर्मचाऱ्याला अधिक लक्षणे असल्याने त्यांना कोविड केंद्रात दाखल केले होते. त्यांचा अहवाल पॉझीटीव्ह आल्यानंतर संपर्कातील इतर सर्व कर्मचाऱ्यांनी कोविड केंद्रात स्वॅब दिले होते. त्यातील आणखीन पाच जण बाधित आढळले आहेत. पॉझीटीव्ह रूग्णांवरील उपचारासाठी येणारा खर्च एसटी महामंडळाने करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: भारताविरुद्ध शाय होपच्या नाबाद १६२ धावांनी मोडला ३७ वर्षांचा रेकॉर्ड; रोहित-डिव्हिलियर्सलाही टाकले मागे

IND vs WI,3rd ODI: शाय होपचं दीडशतक अन् वेस्ट इंडिजचा सर्वात मोठा विजय; मात्र भारताने जिंकली मालिका

PM झालो तर काय करेन? संजय दत्तचं मुन्नाभाई स्टाईलने उत्तर, ट्रम्प यांना म्हणाला...'मामू, तुम भटक गए हो' पंतप्रधान मोदींवरही टोलेबाजी

IND vs WI, 3rd ODI मध्ये ड्रामा! गुरनूर ब्रार ओव्हर अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला, तर रुदरफोर्डच्या विकेटवरूनही वाद

Beed News : येत्या आठवड्यात कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक बीडच्या कारागृहात येणार; वादग्रस्त 'कॉल रेकॉर्डिंग' अन् अवैध कारभाराची स्वतः करणार झाडाझडती

SCROLL FOR NEXT