corona infection to Union Minister of State for Railways Suresh Angadi 
कोल्हापूर

 केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांना कोरोनाची बाधा 

महेश काशीद

बेळगाव - केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांना आज (ता.11) कोरोनाची लागण झाली आहे. मंत्री अंगडी यांनी आज ट्‌विटद्वारे त्याची माहिती दिली आहे. तसेच त्यांनी संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईनबाबत आवाहन केले आहे. 

यापूर्वी आमदार अभय पाटील, ऍड. अनिल बेनके, महांतेश कौजलगी यांना कोरोनाची बाधा झाली होती. उपचारानंतर ते बरे झाले आहेत. आता केंद्रीय मंत्री अंगडी यांना कोरोनाची बाधा झाली आहे. मंत्री अंगडी यांना कोरोनाची लक्षणे जाणवत होती. यामुळे त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून चाचणी केली. यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह झाला आहे. 

डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरु आहेत, अशी माहिती अंगडी यांनी दिली आहे. 

मंत्री अंगडी यांनी दोन दिवसांपूर्वी काडा कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसह पत्रकार उपस्थित होते. याशिवाय बेळगाव-धारवाड रेल्वे मार्गासाठी सुपीक जमीन संपादित केली जाणार आहे. याला आक्षेप घेत शेतकऱ्यांनी अंगडी यांची भेट घेतली. त्यांना आरेखन बदलून सुपीक जमीन वाचवली जावी, या आशयाचे निवेदन दिले. याशिवाय इतरांनी त्यांची भेट घेतली आहे. यामुळे संपर्कातील व्यक्तींनी क्वारंटाईन व्हावे, असे आवाहन केले आहे.  

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'विझलो जरी मी...', पोस्ट ठरली अखेरची, नगराध्यक्षपदाची निवडणूक लढलेल्या मनसे नेत्याचा अपघाती मृत्यू

Satara Fraud: 'साताऱ्यातील महिलेला २५ तोळे दागिन्यांना गंडा'; मैत्री नडली अन् चाैकशीत आलं धक्कादायक कारण समाेर..

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणार 12,000 शिष्यवृत्ती; वार्षिक उत्पन्न 3.50 लाख रुपये अन्‌ आठवीत पाहिजे ५५ टक्के गुण

मोठी बातमी! दारूचे दर वाढले अन्‌ विदेशी दारूचा खप झाला कमी; बनावट दारू व हातभट्टीची वाढली विक्री; दुकानदारांकडूनही हिशेबात चलाखी, वाचा...

Christmas Special: केळीपासून फक्त बनाना केकच नाही! ‘हे’ 5 ख्रिसमस रेसिपी ट्राय करा, सगळे विचारतील सीक्रेट

SCROLL FOR NEXT