corona lock down effect on poor peoples in belgum 
कोल्हापूर

घरात खायला कण नाही, साधं मिठ विकत घ्यायलाही पैसे नाहीत... म्हणून या महिलांनी उचलले हे पाऊल...

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - घरात शिल्लक असलेला तांदूळ, ज्वारी संपली. आता घरात काहीच शिल्लक नाही. साधं मिठ विकत घ्यायलाही पैसे नाहीत अशी तक्रार करीत शहरातील रामनगर, वड्डरवाडी परीसरातील महिला बुधवारी (ता.22) महापालिका कार्यालयावर मोर्चा घेवून गेल्या. हा परिसर महापालिकेच्या मुख्य कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर आहे. मोर्चा घेवून गेलेल्या या महिलांना महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच त्याना रोखण्यात आले. यावरून तेथील सुरक्षारक्षक व त्या महिलांमध्ये वाद झाला. शासनाकडून गरजू लोकांना मदत दिली जात आहे असे ऐकले, पण आमच्यापर्यंत कोणी आलेच नाही. महापालिकेने तरी आम्हाला धान्य द्यावे अशी मागणी त्यानी केली. त्यांची तक्रार ऐकण्यासाठी तेथे कोणीच नव्हते. अखेर पालिकेच्या एका कर्मचाऱ्याला त्यांची दया आली. त्याने महापालिकेचे कार्यकारी अभियंते श्री. हिरेमठ यांना त्या महिलांच्या मोर्चाची माहिती दिली. त्यांनी महिलांची भेट घेवून त्याना मदत देण्याची ग्वाही दिली. त्यानंतर महिला तेथून निघून गेल्या.

महापालिकेपासून हाकेच्या अंतरावरील काही कुटुंबांची उपासमार

सीलडाऊन मुळे बेळगाव महापालिकेचे मुख्य कार्यालय गेल्या महिनाभरापासून बंद आहे. या काळात महापालिकेवर कोणताही मोर्चा आला नाही. महापालिकेचे अधिकारी व कर्मचारीही कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांमध्ये व्यस्त आहेत. शिवाय नागरीकांना घरातून बाहेर पडण्याची मुभा नाही. कोरोनामुळे शहरातील निरीश्रीत किंवा गरजूंना महापालिकेकडून मदत दिली जात आहे. देणगीदारांकडून जे अन्नधान्य, भाजीपाला किंवा अन्य साहित्य दिले जात आहे, त्याचे वाटप महापालिकेकडून केले जात आहे. पण महापालिकेपासून हाकेच्या अंतरावरील काही कुटुंबांची उपासमार सुरू आहे. त्याची माहिती महापालिकेला मिळालेलीच नाही. महापालिकेकडून शहरातील 30 ठिकाणी अन्नपुरवठा केला जात आहे. ज्या ठिकाणी नागरीकांची उपासमार होत आहे, त्या ठिकाणी पालिकेचे कर्मचारी अन्न घेवून जात आहेत.

शासनाकडून, लोकप्रतिनिधींकडून, काही संस्था व दानशूर व्यक्तींकडूनही आर्थिक मदत दिली जात आहे. पण रामनगर, वड्डरवाडी येथील कुटुंबापर्यंत कोणीच पोहोचलेले नाही. त्यानी मदतीची प्रतिक्षा केली, पण कोणीच आले नाही. घरातील सर्व अन्नधान्य संपले, तेल, मीठ व तिखटही संपले. त्यामुळे मग महिलांनी घरातून बाहेर पडून महापालिका कार्यालयाकडे जाण्याचा निर्णय घेतला. दहाहून अधिक महिलांना थेट महापालिकेवर मोर्चाच काढला. कोरोनाच्या काळातील हा बेळगावातील एकमेव मोर्चा ठरला. आता महापालिकेकडून त्याना मदतीची ग्वाही देण्यात आली आहे. पण लॉक डाऊन मागे घेतले जाईपर्यंत संसाराचा गाडा चालणार? हा प्रश्‍न त्यांच्यासमोर कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phaltan Doctor Case : फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षकाचे निलंबन; फरार आरोपींचा शोध सुरु

Mumbai Crime: मुंबईत दिवसाढवळ्या थरार! जीव मुठीत घेऊन रस्त्यावर पळत सुटली पण...; प्रियकराचं प्रेयसीसोबत धक्कादायक कृत्य

Shreyas Iyer ने कसोटी क्रिकेटमधून का घेतला ब्रेक? अखेर स्वत:च सांगितलं नेमकं खरं कारण काय

Mumbai News: विरार ते मरीन ड्राइव्ह आता नॉन-स्टॉप! सी लिंक प्रकल्पाला 'पर्यावरण'ची अंतिम मंजुरी

Female Doctor Case: पीएसआय आणि अन्य आरोपीनं महिला डॉक्टरचा छळ का केला? पीडितेच्या भावानं खरं कारणच सांगितलं, वाचा इनसाईड स्टोरी...

SCROLL FOR NEXT