corona lockdown effect on band company mangur nipani 
कोल्हापूर

कोरोनाने वाजविला 'बँड'चाच 'बँड'...

तानाजी बिरनाळे

मांगूर (निपाणी) - कोरोनाची त्सुनामी प्रत्येक ग्रामीण भागापर्यंत पोचली आहे. त्यात लहान-सहान व्यावसायही केंव्हाच बुडून गेले आहेत. शासनाने सभा-समारंभांवर बंदी घातल्याने ऐन लग्न हंगामातही कार्यक्रमांचे विडे नाहीत. त्यामुळे बँड व्यावसायाचाच 'बँड' वाजला आहे. निपाणी तालुक्यातील मांगुरच्या दोन पथकातील पन्नास कलाकार कामाविनाच घरी हतबल होऊन बसले आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याची स्थिती पहावयास मिळत आहे.

मांगूर येथे साठ वर्षांपासून गंधर्व बँड कंपनी व स्वामी दरबार बँड कंपनी या पथकांनी आपल्या कलेच्या माध्यमातून नावलौकिक मिळवला आहे.  कुटुंबीयांनबरोबरच पन्नासहून अधिक कलाकार दोन पथकात काम करतात. जानेवारी-मे या चार महिन्यात लग्न, यात्रा, सण, उत्सव, जयंती, महोत्सवाच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातून कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. या वर्षीच्या हंगामातही विविध गावात कार्यक्रमांचे बुकिंग झाले होते. पण कोरोनामुळे कलाकारांवर घरातच बसण्याची वेळ आली आहे. लॉक डाऊन काळात अनेक कुटुंबांची परवड होत आहे. त्यामुळे शासनाने कलाकारांकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

भोरे कुटुंबीयांची एक गुंठाही जमीन नाही. संपूर्ण कुटुंब कलेवरच उपजिविका करते. कुटुंबातील युवक पदवीधर असून देखील याच कलेकडे वळले आहेत. पण सध्या कोरोनाच्या परिणामाने भोरे कुटुंबीय आर्थिक कोंडीत सापडले आहेत. शासनाने बँड पथक व कलाकारांना आर्थिक मदत देऊन या संकटातून दूर करण्याची मागणी कलाकार विजय भोरे, सुनील भोरे, अक्षय भोरे, श्रीधर भोरे, शुभम  भोरे, अभिजीत भोरे व कुटुंबीयांनी केली आहे.
 

'आयुष्यभर गायन कलेने मला साथ देत आयुष्याचा गाडा चालविला. पण कोरोनाने आमच्या कलेचा गाडाच एकाच ठिकाणी रुतविल्याने जणू जीवनचक्र थांबले आहे. त्यामुळे शासनाने आमच्याकडे लक्ष देऊन आर्थिक सहकार्य करावे.'
- विजय भोरे,
 बँड पथक चालक-मालक, मांगूर

'आमची एक गुंठाही जमीन नाही. संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह कलेवर चालतो. पण कोरेनाने पूर्ण बॅन्ड व्यवसाय ठप्प केल्याने हतबल झालो आहोत.'
- सुनील भोरे,
 बँड पथक चालक-मालक, मांगूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Latest Marathi News Updates: मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो... - सुप्रिया सुळेंचं विधान!

अनधिकृत बांधकामधारकांना उच्च न्यायालयाचा दणका! आता पाच मजली अनधिकृत इमारतीवर बुलडोझर चालणार

विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची शेवटची संधी! सोमवारी जाहीर होतील रिक्त जागा; प्रवेशासाठी २९ व ३० ऑगस्टपर्यंत मुदत, वाचा...

Mumbai Goa Highway: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांची गर्दी! मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT