Corona to a man in contact with a doctor in Khutalwadi 
कोल्हापूर

खुटाळवाडीतील डॉक्‍टरच्या संपर्कातील युवकाला कोरोना

दिग्विजय कुंभार

आंबा : सुपात्रे (ता. शाहूवाडी) येथील 29 वर्षीय युवक आज कोरोना पॉझिटिव्ह आढळला. तो खुटाळवाडीतील डॉक्‍टरच्या संपर्कातील आहे. डॉक्‍टरच्या संपर्कातील 90 जणांपैकी 25 जणांचे स्वॅब निगेटिव्ह आल्यामुळे लोकांना दिलासा मिळाला असतानाच सुपात्रेतील युवक पॉझिटिव्ह आल्यामुळे खुटाळवाडी व बांबवडे परिसरात समूह संसर्गाच्या भीती व्यक्त होत आहे. 

खुटाळवाडी येथील बाधित स्थानिक डॉक्‍टरच्या संपर्कात आलेल्या सात जणांना आज क्वारंटाइन केले. त्यामुळे डॉक्‍टरच्या संपर्कात आलेल्यांची संख्या 110 झाली आहे. दरम्यान, वडगाव येथील पॉझिटिव्ह जवानाच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील चार व त्याचा एक मित्र अशा पाच जणांना क्वारंटाइन केले आहे. तालुक्‍यात आतापर्यंत बाधितांची संख्या 193 झाली आहे. 

नवरदेवालाच व्हावे लागले क्वारंटाइन... 
तालुक्‍यातील जुळेवाडी येथील एका जवानाचे लग्न होते. कोल्हापुरातील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात त्याचा स्वॅब घेतला होता. तिथे त्याला होम क्वारंटाइनचे पत्र दिले. लग्न असल्यामुळे तो क्वारंटाइन झाला नाही. कोरोना दक्षता कमिटीनेही याकडे गांभीर्याने घेतले नाही. क्वारंटाइन कालावधीत लग्न करत असल्याच्या कारणावरून महसूल, पोलिस व आरोग्य प्रशासनाने त्याच्यावर कारवाई केली. लग्न सोहळा रोखून त्याला पेरीड येथील कोविड केअर सेंटरवर नेले. स्वॅब घेऊन पुन्हा क्वारंटाइन केले. 

दृष्टिक्षेप 
- सुपात्रेतील युवकाला कोरोना बाधा 
- डॉक्‍टरच्या संपर्कातील 90 पैकी 25 स्वॅब अहवाल निगेटिव्ह 
- समूह संसर्गाचा धोका वाढत असल्याचे स्पष्ट 
- शाहुवाडा तालुक्‍यात बाधितांची संख्या 193 वर 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

POR vs CRO Live: ख्रिस्तियानो रोनाल्डोने इतिहास रचला! चेहऱ्यावरचा आनंद बरंच काही सांगून गेला, Video Viral

T20 World Cup : इंग्लंड-ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनल खेळणार; दक्षिण आफ्रिकेचा उपांत्य फेरीत दारूण पराभव

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

SCROLL FOR NEXT