Corona nephew attends Mama's funeral in kolhapur 
कोल्हापूर

मामाच्या अंत्यसंस्कारला कोरोना झालेला भाचा सहभागी झाला अन्...

नामदेव माने

कसबा बीड ( कोल्हापूर) - वळीवडे येथील कोरोनाने मृत्यू झालेला तरूण महे (ता.करवीर) येथील आपल्या मामाच्या अंत्यसंस्काराला पाच दिवसापूर्वी आला होता. मामाच्या अंत्यसंस्कारावेळी पाहुणे व ग्रामस्थ मिळून जवळपास २५० लोक सहभागी झाले होते. या गर्दीमध्ये तो तरूण बराचवेळ सहभागी होता. त्याचाच मृत्यू कोरोनाने झाला असल्याची बातमी महे गावात समजली आणि ग्रामस्थ व आरोग्य यंत्रणेची चांगलीच झोप उडाली. 


 स्थानिक प्रशासन व आरोग्य यंत्रणेने अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या पाहुण्यांना व ग्रामस्थांना फोन वरून ही माहिती दिली. सहभागी प्रत्येक व्यक्तीने स्वतःला अलगीकरण करून घ्यावे असे, आवाहन केले. या घटनेनंतर  गावात औषध फवारणी करण्यात आली. गावातील सर्व व्यवहार पूर्ण बंद ठेवून. गाव पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ गावावर आली.


दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. सांयकाळी ३४ रूग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह आल्यानंतरा आता आणखी २५ जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आज दिवसभरात तब्बल ५९ नव्या रूग्णांची भर पडली आहे. दिवसभरातील ५९ रूग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोना ग्रस्तांची संख्या ११२८ वर पोहोचली आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT