Corona patient found, will ZP wake up now? 
कोल्हापूर

कोरोना रूग्ण सापडलाय, आता तरी जिल्हा परिषदेला जाग येणार का? 

सदानंद पाटील

कोल्हापूर : संपूर्ण जिल्ह्याला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून औषध पुरवठा केला जातो. या आरोग्य विभागाचे औषध भांडार हे कागलकर हाउस येथे आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून लोक या ठिकाणी औषधं नेण्यासाठी येतात. अशा या कागलकर हाउस येथील एक महिला कर्मचारी कोरोना बाधित झाली आहे. या इमारतीत सात ते आठ विविध विभाग असून किमान 200 कर्मचारी कार्यरत आहेत. तरीही या इमारतीच्या पाणी व स्वच्छतेचा विषय कधी गांभीर्याने घेतला जात नाही. आता कोरानाचा रुग्ण सापडल्यानंतर तरी जिल्हा परिषदेला जाग येणार का?, असा प्रश्‍न या विभागातील कर्मचारी करत आहेत. 

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आवारात कागलकर हाउस ही इमारत आहे. ही इमारत म्हणजे पुर्वीची जिल्हा परिषद. नवीन इमारत झाल्यानंतर या ठिकाणी विविध विभागांची कार्यालयं सुरु झाली. सध्या या इमारतीत मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची शाखा, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, यांत्रिकी विभाग, सर्व शिक्षा अभियान, ग्रामीण पाणी पुरवठ्याचा शाहूवाडी उपविभाग, बांधकाममधील इमारत विभाग, परिषदेला आरोग्य विभागाचे औषध भांडार, स्थानिक निधी लेखा परीक्षण विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय आहे. तसेच या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या व्यायामशाळेची इमारत व एक कॅन्टीन आहे. या इमारतीत दररोज हजारभर माणसांची ये-जा सुरु असते. 

नवीन इमारत झाल्यानंतर या कागलकर हाउस इमारतीची म्हणावी तशी देखभाल झालेली नाही. कधी निधीचा अभाव तर कधी हेरिटेज वास्तूचे नाव सांगून या इमारतीकडे दुर्लक्ष केले जाते. या ठिकाणी स्वच्छतागृह आहेत मात्र त्याची स्वच्छता अपघातानेच होते. पाण्याची अवस्था न विचारण्यासारखी आहे. तुटलेल्या बादल्या, मोडलेले कडी-कोयंडे, फुटलेले नळ अशी या इमारतीची परिस्थिती आहे. अशातच आता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील एक महिला कर्मचारी कोरोना बाधित झाली आहे. त्यामुळे या इमारतीत येणाऱ्या शेकडो लोकांचे व त्यांच्या कुटुंबियांचे धाबे दणाणले आहेत. किमान कोरोनाच्या काळात तरी इमारतीची स्वच्छता जपावी व सातत्याने हा परिसर निर्जंतुकीकरण करावा, अशी मागणी होत आहे. 

या इमारतीत सोमवारी महापालिकेच्या वतीने औषध फवारणी झाली. त्यानंतर इकडे कोणी फिरकलेले नसल्याचे कर्मचारी सांगत आहेत. या ठिकाणी जिल्ह्याला औषध पुरवठा करणारे औषध भांडार आहे. चुकूनही या ठिकाणी एखाद्या पॉझिटिव्ह व्यक्‍तीचा संपर्क आला तर त्याचे जिल्ह्याला दुष्परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे इमारत परिसर निर्जंतुकीकरण करावा. 
- उमेश आपटे, पक्षप्रतोद. 


दृष्टिक्षेप 
- आरोग्य विभागाकडून संपूर्ण जिल्ह्याला औषध पुरवठा 
- कागलकर हाऊसमध्ये एक महिला कोरोना बाधित 
- सात-आठ विभागात दोनशे कर्मचारी कार्यरत 
- कधी निधी, कधी हेरिटेजचे कारण सांगत स्वच्छतेकडे दुर्लक्ष 
- स्वच्छता गृहांचीही दुरवस्था 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT