Corona patients have been found at Kudchi belgum 
कोल्हापूर

बेळगावच्या या भागात आढळत आहेत कोरोनाचे रूग्ण ; उडालीय खळबळ...

सकाळवृत्तसेवा

रायबाग (बेळगाव) -  कु़डची येथे या आधी कोरोनाचे चार रूग्ण आढळले आहे. आज (ता. १२) पुन्हा तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने येथे खळबळ उडाली आहे. कुडची परिसरात दुपारी समजल्यापासून भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासन व पोलिसांकडून आता बंदोबस्त कडक होणार आहे.

जिल्ह्यात चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे रविवारी (ता. १२) स्पष्ट झाले. त्यात कुडची येथील तीन जण असल्याचे परिसरातील भीतीच्या वातावरणात वाढ झाली आहे. आता येथील रूग्णांची संख्या सातवर पोहोचली आहे. निझामुद्दीनमधील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्याशी या रुग्णांचा संपर्क आला असल्याने आणखी तिघांना संसर्ग झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.  य़ेथील संसर्ग झालेल्यांचे वय १९, ५५ व २५ असे आहे. वाढत्या संसर्गामुळे सर्वसामान्य लोकांमधून चिंता वाढली आहे.

गेल्या रविवारी कुड़चीतील चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. तेंव्हापासूनच जिल्हा व तालुका प्रशासन, पोलिस आणि आरोग्य खाते सतर्क झाले आहे. जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी यांनी दोनवेळा भेट दिली आहे. तहसीलदार चंद्रकांत बजंत्री, अथणीचे पोलिस उपाधीक्षक एस. व्ही. गिरीश, कुडचीचे उपनिरीक्षक शिवराज दरीगाैड, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. एस. एस. बाणे, कुडची समुदाय आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. सतीश कलट्टी यांच्यासह अधिकारी तळ ठोकून आहे. ११ एप्रिलपासून सीलडाऊन केले असून ड्रोन कॅमेऱय़ाची नजर ठेवण्यात आली आहे. आता आणखी तीन जण आढळल्याने बंदोबस्त वाढविला जाणार आहे. आरोग्य खात्याक़डून त्वरित उपाययोजना करण्यात येणार आहे.

प्रत्येक नागरिकाचे होणार थर्मल स्कॅनिंग

कु़डची येथे एकुण कोरोनाचे सात रूग्ण आढळल्याने चिंतेत भर पडली आहे. शहरातील प्रत्येक नागरिकांचे बचावासाठी थर्मल स्कॅनिंग करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य खात्याकडून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: "देश ज्ञानेश कुमारांच्या बापाचा आहे का?" उद्धव ठाकरे कडाडले; केंद्र सरकारवरही बोचरी टीका

Maharashtra MLC Election 2026 : भाजपची मोठी घोषणा! विधान परिषद निवडणुकीसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचे उमेदवार जाहीर; पाहा संपूर्ण यादी

Latest Marathi News Live Update : CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Masarul Dam Water: अवैध उपशामुळे धरणाच्या पाणीसाठ्यावर संकट;मासरूळ धरणातील उपशावर कारवाईची मागणी

Kikvi Project Deal : किकवी प्रकल्प व्यवहाराच्या कोणत्याही चौकशीस तयार माजी संचालकांचा खुलासा; करार पारदर्शी

SCROLL FOR NEXT