Corona patients will be tested for tuberculosis 
कोल्हापूर

कोरोना रुग्णांची होणार क्षयरोग चाचणी

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर, : ज्या रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, अशा रुग्णांची चार लक्षणांच्या समुहाच्या आधारे क्षयरोगाची तपासणी करण्यात येणार आहे. लक्षणांमध्ये दोन आठवाड्यापेक्ष्या जास्त कालावधीचा खोकला, ताप, वजनामध्ये घट अशी लक्षणे असणाऱ्या कोरोना रुग्णांची तपासणी "एक्‍स रे' आणि "सीबीनेट'द्वारे करून क्षयरोग निदान करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ऊषादेवी कुंभार यांनी दिली. 
सर्व क्षय रुग्णांची कोरोना तपासणी करण्यात येणार आहे. क्षयरोग -कोरोना द्विदिशात्मक तपासणी करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारच्या आरोग्य कुटुंब कल्याण विभागाकडूने दिल्या आहेत. "सारी' अथवा "ईली' रुग्णांचींही क्षयरोगासाठी 
तपासणी करण्यात येणार आहे. क्षयरोग निदानासाठी तपासणी करणे तर क्ष यरुगांची कोरोना निदानासाठी तपासणी करणे होय. क्षयरोग असलेल्या व्यक्तींमध्ये 2.1 पट कोरोनाचा धोका असतो. क्षयरोग व कोरोना या दोन्ही समस्यांचे निराकरण करणे अत्यंत आवश्‍यक आहे. क्षयरोग असलेले सर्व कोरोना रुग्ण आजाराच्या गंभीरतेनुसार समर्पित कोविड काळजी केंद्र-समर्पित कोविड आरोग्य केंद्रात भरती करण्यात येणार आहे. सीपीआर रुग्णालयाच्या कृष्णा बिल्डिंगमध्ये वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली क्षयरोग तपासणीसाठी बाह्यरुग्ण तपासणी सेवा व निदानासाठी सीबीनेट सुविधा सुरु आहेत. याचा लाभ रुग्णांनी घ्यावा, असे आवाहनही डॉ. कुंभार यांनी केले. 

40 क्षयरुग्णांचे निदान 
जिल्ह्यामध्ये कोरोना निगेटीव्ह रुग्णांमधून 40 क्षयरुग्णांचे निदान झाले आहे. "सारी' व "ईली' निगेटीव्ह 9 रुग्णांमधून क्षयरुग्णांचे निदान झाले आहे. तीव्र श्वसन संक्रमण आजार सारी व इन्फ्लूएंझा सारख्या आजार ईली असे आहेत.

संपादन ः यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought: दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढणार, लोकप्रतिनिधींकडून आणखी तालुक्यांचा समावेशाच्या मागणीची शक्यता

Vaijapur Student Assault Case: गणिताचे कोडे न सुटल्याने चौथीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण

Shiv Sena Leader Death : शिंदेसेनेच्या बड्या नेत्याने उचललं टोकाचं पाऊल, शेती पिकत नसल्याने घेतला निर्णय

Latest Marathi News Live Update : मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा

ST Bus: एसटी प्रवासात NCMC कार्ड अनिवार्य; फक्त ३ दिवस बाकी, आताच करा 'हे' काम, अन्यथा सवलत रद्द

SCROLL FOR NEXT