Corona positive patient found in kolhapur 
कोल्हापूर

कहर सुरूच ; कोल्हापूर जिल्ह्यात आणखी 25 कोरोना पाॅझिटिव्ह...

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - नुकत्याच आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी 25 कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांचा आकडा 427 वर पोहचला आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असल्याने बाधितांचा आकडा 400 पार झाला आहे. बहुतेक जण मुंबई ,पुणे ,सोलापूर अशा रेडझोन परिसरातून प्रवास करून आलेले आहेत तर काही व्यक्ती यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या होत्या अशा सर्वांचे स्वॅब टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत. अशी माहिती वैद्यकीय यंत्रणेने दिली आहे.

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 

बाधितांचा चारशेचा टप्पा पार
दरम्यान, गेल्या १४ दिवसांत सतत कोरोनाग्रस्तांची वाढलेली संख्या कमी होत आहे. दिवसभरात १९ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या, तर ५७३ व्यक्तींचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले. आजवर ३९ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. जिल्हाभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता ४२७ झाली  असून मुंबई, पुणे, सोलापूर भागातून जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी आलेल्या व्यक्तींची तपासणी गेल्या काही दिवसांत सुरू आहे.

कोरोनासदृश लक्षणे दिसणाऱ्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्याचे अहवाल प्राप्त होत असून काल दिवसभरात १९ व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्या सर्वांनी प्रवास केल्याचे स्पष्ट झाले आहे. यात शाहूवाडीतील सर्वाधिक १४ जण आहेत. अन्य तीन तालुक्‍यातील प्रत्येकी एक ते दोन आहेत. अजूनही दीड हजारांवर स्वॅबचे परीक्षण येत्या दोन दिवसांत होणार आहे. त्यातही बाहेरून आलेल्या व्यक्तीच अधिक आहेत. 

काल दिवसभरात एकूण २० व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. यापूर्वी १९ व्यक्ती कोरोनामुक्त होत्या. या सर्वांना आज १०८ रुग्णवाहिकेतून घरी सोडण्यात आले. सीपीआर रुग्णालयात तालुक्‍यातील शासकीय रुग्णालयांच्या डॉक्‍टरांनी परिश्रमपूर्वक या सर्वांवर उपचार केले. येत्या चार दिवसात आणखी काही व्यक्ती कोरोनामुक्त होण्याची शक्‍यता आहे. त्यानुसार पहिला स्वॅब निगेटिव्ह आलेल्या आणखी १६ रुग्णांचे दुसरे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.  

कालपर्यंतची तालुकावार रुग्णांची संख्या
आजरा -३२, भुदरगड- ५१, चंदगड -२५, गडहिंग्लज -१६, गगनबावडा -६, हातकणंगले-५, कागल-११, करवीर -११, पन्हाळा -२०, राधानगरी -४८, शाहूवाडी -१३५, शिरोळ -५, इचलकरंजी - ११, कोल्हापूर शहर - २०, अन्य राज्यातील -६.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: बुमराहशी जो नडला, त्याला आम्ही गाडला! शुभमन गिल अन् झॅक क्रॉली यांच्यात बाचाबाची, काय घडलं? Video

IND vs ENG 3rd Test: भारताकडे '०' धावांची आघाडी; ११ धावांत गमावले ४ बळी, कसोटीत असे केव्हा घडले अन् निकाल काय लागला होता?

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

SCROLL FOR NEXT