Corona positive patient found in rankala tower  
कोल्हापूर

कोल्हापुरातील रंकाळा टाॅवर परिसरात 1 कोरोना पाॅझिटिव्ह...

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - कोल्हापूर शहरातील रंकाळा टाॅवर येथील 32 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हा परिसर सध्या सिल करण्यात आला आहे.त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली.शहरातला हा 22 वा कोरोनाचा रुग्ण आहे.

दुधाळी परिसरात असलेल्या एका डॉक्टर दाम्पत्याचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती आज मिळाली. त्यापाठोपाठ संबंधित खाजगी दवाखाना व रंकाळा परिसर वैद्यकीय यंत्रणेने सील केला. शहरात आढळलेला हा 22 वा कोरोना पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. दुधाळी रंकाळा परिसरात एका खाजगी दवाखान्यात डॉक्टर दांपत्य काम करते.त्यांचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आल्याने या दवाखान्यात उपचार घेणारे रुग्ण तसेच या डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती यांचा शोध घेऊन त्यांना व्काॅरंटाईन करण्याची प्रक्रिया आरोग्य यंत्रणेने दुपारी सुरू केली.

गेल्या दहा पंधरा दिवसात कोरोना पॉझिटिव्ह आढळण्याचे प्रमाण ग्रामीण भागात अधिक होते. जवळपास 667 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. तर 425 व्यक्ती कोरोना मुक्त झाले आहेत. यातील 92 टक्के व्यक्ती या जिल्ह्यातील डोंगरी तालुक्यातील आहेत. अशा गेल्या दहा दिवसात शहरात एकूण चार व्यक्ती कोरोनो पॉझिटिव्ह आढळल्या. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापाठोपाठ आज दुधाळी परिसरात आणखी एक डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे त्यामुळे खळबळ उडाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli ACB Trap : भूमी अभिलेखमधील दोघे लाच घेताना जाळ्यात; ईश्‍वरपुरात रचला सापळा, प्रॉपर्टी कार्डावर क्षेत्र दुरुस्तीसाठी घेतले 50 हजार

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT