शिरोली पुलाची - कोल्हापूर जिल्हातील इतर भागात कोरोना पॉझिटीव्ह सापडत असताना शिरोलीत आजपर्यंत एकही रुग्ण सापडला नव्हता ; मात्र आज पुण्याहून आलेल्या एका महिलेचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने प्रशासनाची धावपळ झाली. पॉझिटीव्ह महिला संजय घोडावत विद्यापीठात संस्थात्मक विलगीकरण कक्षात असून, पंधरा मिनीट ते येथील घरात आली होती. त्यामुळे शिरोलीकरांना धोका नाही ; मात्र त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेण्याचे काम प्रशासनाने सुरु केले आहे.
याबाबतची माहिती अशी, कोरोना पॉझिटीव्ह महिला चार दिवसापूर्वी कुटूंबासह पुण्याहून आलेली आहे. किणी टोल नाक्यावर पोलीस प्रशासनाने त्या कुटूंबाला संजय घोडावत विद्यापीठात संस्थात्मक विलगीकरण कक्षात जाण्यास सांगीतले ; मात्र त्यांनी संस्थात्मक विलगीकरण कक्षात जाण्याऐवजी थेट येथील विठ्ठल मंदिर परिसरातील घरात आले. त्यावेळी शेजाऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात त्याच्या विषयी तक्रार केली. पुण्याहून आलेत ही माहिती मिळताच संस्थात्मक विलगीकरण कक्षात जावा, अन्यथा गुन्हे दाखल करण्याचा इशारा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी त्यांना दिला. यामुळे पंधरा मिनीटातच ते संजय घोडावत विद्यापीठातील संस्थात्मक विलगीकरण कक्षात गेले. तेथे त्यांची तपासणी केली व ७५ वर्षीय आजीचा स्वॅब घेण्यात आला. आज सकाळी या आजीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. ही बातमी शिरोलीत वाऱ्यासारखी पसरली. यामुळे नागरिक भयभीत झाले.पंधरा मिनीट आम्ही घरी होतो ; मात्र आमच्या संपर्कात कोणीही आले नसल्याचे त्या कुटूंबाने सांगीतले. तरीही प्रशासनाकडून माहिती घेण्याचे काम सुरू आहे.तो परिसर सील करण्याबाबत पोलीस व ग्रामपंचायत यांची बैठक सुरू आहे.
शिरोलीत कोरोनाचा शिरकाव झाला असला तरी पॉझिटिव्ह महिला संस्थात्मक विलगीकरण कक्षात आहे. त्यामुळे शिरोलीकरांनी घाबरून न जाता, दक्षता घ्यावी आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन सरपंच शशिकांत खवरे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.