Corona reached home, but no seriousness in the citizens .... 
कोल्हापूर

कोरोना घरात पोचला, तरी नागरिकांत गांभीर्याचे नाव नाहीच.... 

प्रवीण जाधव

गांधीनगर : कोरोना विषाणुचा प्रवास उंबरठ्यावर नव्हे तर अगदी घरापर्यंत येऊन पोहोचला तरीही कोणत्याही प्रकारची खबरदारी गांधीनगर (ता. करवीर) येथे घेतली जात नाही. कोरोना विषाणुचा समूह संसर्ग सुरु होत असताना सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे बनले आहे. गांधीनगर ही महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यातील सर्वात मोठी बाजारपेठ बनत चालली आहे. याठिकाणी वेगवेगळ्या वस्तूंची घाऊक आणि किरकोळ दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत. 

या दुकानांमध्ये काम करणारे हजारो कर्मचारी कार्यरत आहेत. कोरोना लॉकडाउननंतर बाजारपेठ हळूहळू स्थिरावत असताना पुन्हा एकदा कोरोना महामारीने उसळी घेतली. गांधीनगरात एक, अगदी खेटून असलेल्या वळिवडे गावामध्ये दोन आणि उचगावमधील मणेर मळ्यात दोन अशी परिसरातील रुग्णांची संख्या पाच झाली आहे. यातील वळिवडेतील तरुणाचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये व्यापारी, ग्राहक, कर्मचारी, प्रशासन, पोलिस अशा सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे आहे. परंतु बाजारपेठेत फिरताना अशी कोणत्याही प्रकारची काळजी तर सोडाच परंतु खबरदारीही घेतली जात नाही. 

काही दुकानांमध्ये मालक लोकांनी स्वतःपुरती काळजी घेत ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या जबाबदारीवर सोडल्याचे चित्र दिसून येत आहे. महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि कर्नाटक सीमाभागातून मोठ्या प्रमाणावर ग्राहक येत आहेत. आलेल्या ग्राहकांना हाताळण्याचे काम कर्मचाऱ्यांवर सोपवून काही मालक लोक स्वतःपुरती काळजी घेत असल्याचे चित्र काही ठिकाणी पहावयास मिळत आहे. कोरोनाचे गांभीर्य तर नाहीच परंतु आरोग्य आणि सुरक्षेचा अक्षरशः बोजवारा काही ठिकाणी उडाल्याचे दिसून येत आहे. गांधीनगर परिसरात जर कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी घेतली नाही तर भविष्यात मोठ्या संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार बोलून दाखवत आहेत. 

कंटोनमेंट झोनच्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला असून याठिकाणी येणाऱ्या, जाणाऱ्या लोकांची नोंद घेण्याचे काम सुरु केले आहे. 
- दिपक भांडवलकर, सहायक पोलिस निरीक्षक 

दक्षता समितीची बैठक घेऊन गावामध्ये लॉकडाऊन करण्याविषयी चर्चा केली परंतु काही व्यापाऱ्यांनी लॉकडाऊन हा काही उपाय होऊ शकत नाही, असे सांगितले. त्यामुळे सर्वांनाच सोशल डिस्टंसिंग, मास्क, सॅनिटायझर वापर याविषयी आवाहन केले. तसेच जे नियम पाऴणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. 
- रितू लालवानी, सरपंच, गांधीनगर 

वळिवडे गावामधील कंटोनमेंट झोनमधील 10 वर्षांच्या आतील आणि 60 वर्षांच्या वरील सर्वांची तपासणी सुरु आहे. संपूर्ण परिसरामध्ये सॅनिटायझेशन केले आहे. गावामध्ये तीन दिवसांसाठी कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. 
- अनिल पंढरे, सरपंच, वळिवडे 


दृष्टिक्षेप 
- गांधीनगर ही महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यामधील सर्वाधिक मोठी बाजारपेठ 
- वस्तूंची घाऊक आणि किरकोळ दुकाने मोठ्या प्रमाणात 
- दुकानांमध्ये हजारो कर्मचारी कार्यरत 
- आरोग्य आणि सुरक्षेचा बोजवारा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Latest Maharashtra News Updates : पंचगंगा नदीची पाणी पातळी चोवीस तासांत सहा फूट सहा इंचांनी वाढली

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

Kolhapur Chappal Prada : ‘प्राडा’ची टेक्निकल टीम कोल्हापुरी पायतान बघून भारावली, कारागिरांची हस्तकला पाहून म्हणाले...

SCROLL FOR NEXT