The corona report of eleven people from Kotij came negative 
कोल्हापूर

कोतीजच्या 'त्या' अकरा जणांचा कोरोना रिपोर्ट आला निगेटिव्ह...

संतोष कणसे

कडेगाव - कोतीज (ता. कडेगाव) येथील मुंबईस्थित पंचावन्न वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या अकरा जणांच्या व येतगाव (ता.कडेगाव) येथील मलकापूरस्थित (कराड) 'त्या' पस्तीस वर्षीय कोरोना बाधित तरुणाच्या संपर्कात आलेल्या चौघांच्या घशातील स्वॅबचे नमुने मंगळवारी (ता.5) आरोग्य विभागाने घेतले होते.त्याचा अहवाल आज सकाळी प्राप्त झाला असून कॊतीज येथील 11 जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल 'निगेटिव्ह' आला आहे.तर येतगावातील कोरोनाबाधित तरुणाच्या संपर्कातील चौघांचा दुसऱ्यांदा कोरोना चाचणी अहवाल 'निगेटिव्ह' आला आहे.त्यामुळे संबंधित,नातेवाईक व कॊतीज येतगावसह तालुक्यातील नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

कोतीज येथील दोन भाऊ मुंबई येथे आपल्या कुटुंबियांसोबत राहतात.तर त्यापैकी एका पंचावन्न वर्षीय व्यक्तीला सर्दी,ताप व खोकला जाणवू लागला. त्यामुळे ते मुंबई येथील रुग्णालयात गेले असता तेथील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी 30 एप्रिल रोजी त्यांच्या घशातील स्वॅबचे नमुने घेतले होते. त्याचा अहवाल शुक्रवारी (ता.1) कोरोना पॉझिटिव्ह आला. तर याच कोरोनाबाधिताच्या दोन मुली, भाऊ,भावजय व पुतणी अशा एकूण पाच व्यक्ती 23 एप्रिल रोजी विना परवाना कोतीज येथे आल्या होत्या.

त्यामुळे कोतीज येथील मुंबईस्थित पंचावन्न वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मुंबईतील रुग्णालयातून सांगली जिल्हा प्रशासनाला रविवारी (ता.3) कळविण्यात आली.कॊतीजसह तालुक्यातील नागरिकांत मोठी खळबळ उडाली होती.तर आरोग्य विभागाने मुंबईहून  कोतीज येथे आलेल्या पाच जणांसह त्यांच्या येथील कुटुंबातील इतर सहा असे एकूण अकरा जणांना कडेगाव येथील शासकीय वसतिगृहात संस्थात्मक क्वारंनटाईन केले.त्यामुळे कोतीजसह तालुक्यातील नागरिकांत पुन्हा प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले.प्रशासनाने कोतीज येथे जाऊन संबंधीत वस्ती सील केली आहे.तसेच गावातही चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर मुंबईहून आलेल्या पाच व्यक्ती व कॊतीज येथील त्यांच्या कुटुंबातील सहा अशा एकूण अकरा जणांचा कोरोना चाचणी अहवाल आज निगेटिव्ह आल्याने संबंधित व कॊतीजसह तालुक्यातील नागरिकाना मोठा दिलासा मिळाला आहे.

तर येतगाव (ता.कडेगाव) येथील मलकापूरस्थित (कराड) 'त्या' पस्तीस वर्षीय कोरोना बाधित तरुणाच्या संपर्कात आलेल्या चौघांचा दुसरा कोरोना चाचणीचा अहवाल आज 'निगेटिव्ह' आला आहे.त्यामुळे येत गावसह,प्रशासन व तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळाला.सात दिवसानंतर या चौघांचे आरोग्य विभागाने दुसऱ्यांदा स्वॅब घेतले होते,त्याचा अहवाल आज सकाळी निगेटिव्ह आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT