Corona Saw on the Jotiba Chaitra Yatra 
कोल्हापूर

जोतिबा चैत्र यात्रेवर कोरोनाचे सावट 

निवास मोटे

जोतिबा डोंगर  :  महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश या राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबा डोंगर ता. (पन्हाळा) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा 7 एप्रिलला होत आहे. या यात्रेवर यंदा कोरोनाचे सावट असून, यात्रा पार पडताना शासकीय यंत्रणेची मोठी दमछाक होणार आहे. आतापासूनच यंत्रणेने डोंगरावर उपायोजना करण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. 

जोतिबा दर्शनासाठी रोज हजारो संख्येने भाविक येतात. रविवारी मोठी संख्या असते, तर चैत्र यात्रेत सात ते आठ लाख भाविक डोंगरावर येतात. त्यामुळे कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती करणे, फलक लावणे, मंदिर स्वच्छता, गाव स्वच्छता, सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छतेसाठी यंत्रणेस मोठी कसरत करावी लागणार आहे. सध्या मंदिरात भाविकांना हातपाय धुवून तसेच त्यांच्या हाताला औषधे व स्टॅरीलियन लावून प्रवेश देणे गरजेचे आहे. आतापासूनच या उपयोजना करण्यासाठी यंत्रणेणे पुढचे पाऊल उचलणे गरजेचे आहे. 

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी या चैत्र यात्रेसंदर्भात एक-दोन तारखेला निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले आहे. जोतिबा चैत्र यात्रेत येणारे सर्रास भाविक हे पुणे-मुंबई सातारा कर्नाटक या भागातील असतात. यात्रेत दोन दिवस मोठी गर्दी असते. यात्रेच्या मुख्य दिवशी काय खबरदारी घेता येईल, याचे नियोजन करणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीने संपूर्ण गावात धूर फवारणी करणे. स्वत: घरी येणाऱ्या भाविकांना हात पाय धुण्यासाठी हॅंडवॉश ठेवणे यासारख्या साध्या गोष्टी करणे गरजेचे आहे. डोंगरावर येणाऱ्या सर्रास भाविकांना देवभावी तलावजवळील नळांवर हातपाय धुण्याची सोय करावी. आतापासूनच पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मंदिरात बायकोसाठी हातपाय धुण्याची सोय केल्यास कोरोनाबाबतची जनजागृती होईल. 

18 रोजी आढावा बैठक 
प्रांताधिकारी तहसीलदार यांच्या उपस्थितीत येत्या 18 मार्चला जोतिबा चैत्र यात्रेची आढावा बैठक होणार आहे. यामध्ये सासनकाठीचालक व्यापारी दुकानदार ग्रामस्थ पुजारी यांची बैठक होईल. एक-दोन तारखेला जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख हे या यात्रेविषयी निर्णय घेतील. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT