Corona stopped in Kudchi village belgum 
कोल्हापूर

'या' गावाने असं हरवलं कोरोनाला ; सर्वत्र होतंय काैतुक....

एम. ए. रोहिले

कुडची (बेळगाव) - रायबाग तालुक्यातील कृष्णा काठावरील समृद्ध गाव. पण कोरोनामुळे ते 'ब्लॅक लिस्ट'मध्ये गेले. मात्र सर्वसामान्य नागरिक व अधिकाऱ्यांनी हे युद्ध जिंकण्याचाच विडा उचलला. यशस्वी झुंज देत कुडची जिंकली आणि कोरोना हरला आहे. येथील सर्वच्या सर्व २५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे नागरिक व अधिकाऱ्यांच्या आदर्शवत शिस्त, समन्वय व चिकाटीचे सर्वत्र कौतूक होत आहे.

कोरोनाने डोके वर काढल्याच्या ५ एप्रिल या पहिल्या  दिवसापासून कुडची भीतीच्या छायेखाली होती. पहिल्याच दिवशी निजामुद्दीन येथील मरजकहून परतल्यावर क्वारंटाइन केलेल्या पैकी चार रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली. मात्र प्रशासन, पोलिस, आरोग्य खाते व नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी मनापासून कंबर कसली.  गुजरात, दिल्ली कनेक्शनपर्यंत पोहोचून वाढता वाढता रुग्णांचा आकडा २ जूनपर्यंत तब्बल २५ वर जाऊन पोहोचला.

कोरोनाला पळवून लावण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र के. व्ही., जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी, प्रांताधिकारी रवींद्र कर्लिंगन्नावर, तहसीलदार चंद्रकांत बजंत्री, अथणीचे पोलिस उपाधीक्षक एस. व्ही. गिरीश, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. एस. बाणे, कुडची पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज दरीगौड, कुडची नगर परिषदेचे मुख्याधिकारी एस. ए. महाजन, कुडचीचे आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कलट्टी यांनी अनेकदा प्रसंगी कठोर निर्णय घेत घेतले. या अधिकाऱ्यांनी तळ सोडलाच नाही. तरीही चिकटून बसलेला कोरोना माघार घ्यायला तयार नव्हता. मात्र नागरिकांनी शहर लॉकडाउन, प्रत्येक गल्ली सील, क्वारंटाइन होण्यासाठी सहकार्य, आरोग्य खात्याकडून रोज तपासणी, नेटका पोलिस बंदोबस्त, अधिकाऱ्यांनी नागरिकांशी समन्वयाने वागून अत्यावश्यक घरपोच सेवा व नियम आणि अटींचे पालन करून अधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. त्यामुळे अखेर सोमवारी (ता. ८) कोरोना रुग्णांची साखळी 'ब्रेक' करण्यात यश मिळाले. त्यामुळे अधिकाऱ्यांसह सर्वसामान्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र अद्याप गाफील राहून चालणार नाही. सोशल डिस्टन्स पाळत मास्क, सनिटायझर वापरून प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

एक नजर...

  • ५ एप्रिल रोजी आढळले पहिले चार रुग्ण.
  • २१ एप्रिल रोजी पहिल्या रुग्णाला डिस्चार्ज
  • कुडची येथील रुग्णांचा आकडा पोहोचला २५ वर.
  • २ जूनला आढळले शेवटचे दोन रुग्ण.
  • ८ जूनला शेवटचा रुग्ण घरी पोहोचल्याने कुडची कोरोनामुक्त.


यापेक्षा वेगळे समाधान ते काय असणार?

येथील अधिकारी व नागरिकांनी कोरोनाला दिलेली टक्कर 'कुडची पॅटर्न' म्हणून फलरुपाला आली आहे. महाराष्ट्र, बिहार, राजस्थान व अन्य राज्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यास हा पॅटर्न उपयुक्त ठरत आहे. कुडचीवासियांच्यादृष्टीने यापेक्षा वेगळे समाधान ते काय असणार? पण जेंव्हा-जेंव्हा आपत्ती येईल, तेंव्हा-तेंव्हा कुडचीचे नाव घेतले जाईल, एवढे मात्र निश्चित!
 

'कुडची कोरोनामुक्त करण्यात अधिकाऱ्यांसह सर्वसामान्यांचे सहकार्य यांचा सिंहाचा वाटा आहे. शहराने एका कटू अनुभवाला सामोरे जात मोठे युद्ध जिंकल्याने प्रत्येक नागरिकाला समाधान वाटत आहे.'
- सादीक सजन,
नगरसेवक, कुडची
 

'शासनाच्या विविध खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व नागरिकांच्या सहकार्यामुळे कुडची कोरोनामुक्त झाली आहे. पण अजूनही बेफिकीर होऊन चालणार नाही. प्रत्येक नागरिकांने सतत खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.'
- एस. ए. महाजन,
मुख्याधिकारी, कुडची नगर परिषद
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT