Corona suspect found in Shirola taluka kolhapur marathi news 
कोल्हापूर

इचलकरंजी ब्रेकिंग -  शिरोळ तालुक्यात सापडला कोरोना संशयित रुग्ण....

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी (कोल्हापूर) : शिरोळ तालुक्यातील टाकवडे येथील एका चालकाला कोरोना संसर्गाचा संशयित म्हणून काल रात्री कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान याबाबत आज सकाळी अनेक उलट-सुलट चर्चा झाल्यानंतर टाकवडे गावात प्रचंड दक्षता घेण्यात आली आहे. संबंधित रुग्णाच्या घराची घराभोवती स्वच्छता करण्यात आली असून येथील प्रशासनाने योग्य ती दक्षता घेतली आहे.

प्रशासनाने  घेतली योग्य ती दक्षता​

 इचलकरंजी येथील एक युवक ऑस्ट्रेलिया या ठिकाणी होता तो 22 मार्च रोजी मुंबई येथे आला. त्याला आणण्यासाठी  टाकवडे येथील हा चालक गेला होता. तो मुंबईहून आल्यानंतर त्याला होम क्कारंन्टाईन  केले होते. कालपासून त्याच्या प्रकृतीमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. तापही अधिक असल्यामुळे त्याला प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्यानंतर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शहरात रुग्णा बाबत उलट-सुलट माहिती पसरली​

दरम्यान या रुग्णा बाबत उलट-सुलट माहिती टाकवडे सह इचलकरंजी शहरात पसरली स्थानिक प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून त्याच्या घराची तसेच परिसराची परिसराचे निर्जंतुकीकरण केले आहे. दरम्यान ऑस्ट्रेलिया मधून जो युवकाला त्या युवकाची ही आज दुपारनंतर सीपीआर रुग्णालयात तपासणी करण्यात येणार असल्याचे समजते. संबंधित युवकास गेल्या 13 दिवसात कोणताही त्रास झालेला नाही तरीही दक्षता म्हणून त्याची तपासणी करण्यात येणार आहे. गरज भासल्यास या युवकाच्या कुटुंबीयांची ही तपासणी केली जाणार आहे. दरम्यान टाकवडे येथील त्या चालकाचा कोल्हापूर सीपीआर रुग्णालयात या रुग्णाचा अध्याप कोणताही अहवाल आला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT