Corona Test Of Teachers In Hatkanangle Taluka Reduced Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

हातकणंगले तालुक्‍यातील शिक्षक कोरोना चाचणीपासून दूर

ऋषीकेश राऊत

इचलकरंजी : कोरोना किटचा तुडवडा, संमतीसाठी पालकांचा निरुत्साह, कोरोनाचा प्रसार यांचा सामना करत सोमवारपासून (ता. 23) शाळा भरवण्यासाठी हातकणंगले तालुक्‍यातील माध्यमिक शाळा सज्ज झाल्या आहेत. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या घंटेसाठी तालुक्‍यातील सुमारे 36.66 टक्के शाळांची तयारी पूर्ण झाली आहे. शिक्षक मोठ्या प्रमाणात कोरोना चाचणीपासून दूर राहिल्यामुळे पहिल्याच दिवशी मुलांच्या तुलनेत शिक्षकांची गैरहजेरी असणार आहे. केवळ 14.97 टक्के शिक्षक शाळेत जाण्यासाठी पात्र ठरले आहेत. 

सोमवारपासून (ता. 23) माध्यमिक शाळांना मुहूर्त मिळाला आहे; मात्र शैक्षणिक स्टाफला कोरोना चाचणी बंधनकारक केल्याने सोमवारपर्यंत कोरोना चाचणी होणे कठीण झाले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारपासून 7 डिसेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता तयारी पूर्ण झालेल्या शाळाच पहिल्या घंटेसाठी सज्ज आहेत. संबंधित शाळेतील बहुतांश कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी झाली आणि रिपोर्ट निगेटिव्ह आला, अशा संस्थांनी सोमवारपासून शाळा सुरू करण्याची इच्छा दर्शवली आहे. 

हातकणंगले तालुक्‍यातील केवळ 525 शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. संजय घोडावत विद्यापीठ, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, पारगाव या तीन ठिकाणी स्त्राव तपासण्याची यंत्रणा कार्यान्वित केली आहे. किटचा तुटवडा असल्याने सोमवारपर्यंत कोरोना चाचणी पूर्ण करणे कठीण बनले आहे. त्यामुळे ज्या शाळांची तयारी पूर्ण झाली आहे आणि ज्या शिक्षकांची कोरोना चाचणी झाली आहे अशा शाळा सोमवारपासून सुरू होणार आहेत.

ग्रामीण भागात मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची संमती समाधानकारक आहे; मात्र शहरी भागात काही शाळांमध्ये वर्गातील पटसंख्येच्या तुलनेत दोन टक्केही पालकांची संमती नसल्याचे चित्र आहे. कोरोनात शैक्षणिक संस्थांचे शाळेच्या पहिल्या दिवसावर पुढचे दिवस अवलंबून असणार आहेत. 

दृष्टिक्षेपात हातकणंगले तालुका 
माध्यमिक शाळा - 150. 
शाळा सुरू करण्याच्या स्थितीत - 55. 
एकूण शैक्षणिक स्टाफ - 3 हजार 505. 
शाळेत जाण्यास पात्र - 525. 
शाळेत जाण्यास अपात्र - 2 हजार 980. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arab Israelis: नेतन्याहू यांच्या खूर्चीला हदरा देणारे २० लाख अरब आले कुठून? इस्रायलमध्ये सत्तापालट होण्याच्या मार्गावर

Latest Marathi News Live Update : दिवाळीत ठाणे ATS ची मोठी कारवाई; १० लाखांचे बक्षीस असलेला फरार नक्षलवादी अटकेत

Tamil Nadu News: तमिळनाडूतील नववधूंना आठ ग्रॅम सोन्याचे नाणे अन् रेशमी साडी; सरकारची नवी योजना

IND-A vs NZ-A Live Score: यशस्वी जैस्वालचा शतकी धडाका... सलग दुसऱ्या सामन्यात किवी गोलंदाजांना ठोकून काढले; १६ चौकार, २ षटकार अन्...

MPSC Exam : ‘एमपीएससी’ गट-क पूर्वपरीक्षा लांबणीवर;आता होणार २४ जानेवारीला; पदसंख्येत ११ हजार १० जागांची वाढ

SCROLL FOR NEXT