बेळगाव : बेळगावच्या ऐतिहासिक आणि वैभवशाली परंपरा लाभलेल्या शिव जयंती उत्सवाचे यावर्षी शताब्दी वर्ष आहे. त्यामुळे यावेळी शिव जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्धार सार्वजनिक शिव जयंती उत्सव मंडळातर्फे करण्यात आला होता. मात्र कोरोनाच्या संकटामुळे 100 वर्षात पहिल्यादांच घरामध्ये शिव जयंती साजरी, करण्याची वेळ आली असून दरवर्षी शिव जयंतीनिमित्त होणारी लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.
स्वातंत्रपूर्व काळात 1919 साली बेळगावात शिव जयंती सार्वजनिक स्वरुपात साजरी करण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला शहरातील फक्त काही मोजक्याच गल्लींमध्ये शिव जयंती केली जात होती. मात्र काही वर्षातच शहराच्या सर्रास गल्लींमध्ये उत्सवास सुरुवात झाली तसेच संपूर्ण देशात फक्त बेळगाव शहरामध्ये तिन दिवस शिव जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. वैशाख शुध्द व्दादशी दिवशी शिव जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो तर दुसऱ्या दिवशी वडगाव, अनगोळ येथे तर तिसऱ्या दिवशी शहर, शहापूर, टिळकवाडी भागातील मंडळाकडून चित्ररथ मिरवणूक काढली जाते.
पारंपारीक वाद्यांचा वापर आणि मराठमोळ्या वातावरणार काढली जाणारी शिव जयंती चित्ररथ मिरवणूक पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने शिवप्रेमी बेळगावात येत असतात. तसेच शिवकालीन इतिहास सादर करीत असताना कोणत्याही प्रकारची उणीव राहू नये याची दखल कार्यकर्त्यांकडून घेतली जाते. त्यामुळे ट्रकची चस्सी शोधने, मावळे व पात्रांच्या कपड्यांची जमवाजमव करणे, देखावे सादर करण्यासाठी रात्र दिंवस सराव करणे यामध्ये मंडळाचे कार्यकर्ते गुंतून जातात त्यामुळे शिव जयंती जवळ येताच शहरात उत्साहाचे वातावरण पहावयास मिळते परंतु यावेळी पहिल्यादांच आपल्याच घरी शिव जयंती साजरी करा आणि आपल्या आपल्या आरोग्याची काळजी घ्या अशी सूचना मध्यवर्ती शिव जयंती उत्सव मंडळातर्फे करण्यात आली आहे. विधान सभा किंवा लोकसभेची निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली तरच प्रशासनाकडून काही नियम व अटी पाळत शिव जयंती उत्सव साजरा करा अशी सूचना काही वेळा करण्यात आली होती हा अपवाद वगळता 100 वर्षात शिव जयंतीवर संकट कधीच ओठवलेले नाही. मध्यवर्ती मंडळाच्या सुचनेनुसार यावेळी घरात शिव जयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हे पण वाचा - Video - खरंच आपण सुशिक्षित आहोत का?
शहरातील शिव जयंती सर्व सामान्यांच्या उत्सवाचा केंद्रबिंदु असून शिव जयंतीची शंभर वर्षांची वैभवशाली परंपरा आपण सर्वांनी जपली असून कोरोनाच्या संकटामुळे शिव जयंती भव्य प्रमाणात साजरी करता येत नाही याची खंत आहे. मात्र यावर्षी शताब्दी उत्सव भव्य प्रमाणात करता आला नाही तरी पुढील वर्षी उत्सव भव्यतेने साजरा केला जाईल
-दीपक दळवी, अध्यक्ष मध्यवर्ती शिव जयंती उत्सव मंडळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.