Coronation at the Palkhi ceremony in Peth 
कोल्हापूर

पेठांपेठांतील पालखी सोहळ्यावर कोरोनाचे सावट 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : मार्गशीर्ष महिन्यातील अध्यात्मिक आनंदोत्सवाला प्रारंभ झाला असून यंदा घरातूनच विविध धार्मिक विधींवर भर द्यावा लागणार आहे. सौंदत्ती यात्रेनंतर चंपासष्टी तसेच शहराच्या जुन्या भागात डिसेंबरमध्ये होणाऱ्या पालखी सोहळ्यावर यंदा कोरोनाचे सावट आहे. गर्दी टाळण्यासाठी कार्यकर्त्यानी पुढाकार घेत उत्सव मोठ्या प्रमाणात करण्यात फाटा दिला आहे. 
डिसेंबर महिना हा पालखी सोहळ्याचा काळ. या महिनाअखेर होणारी सौंदत्ती यात्रा कोरोनामुळे रद्द झाली. नंतर आठ दिवसांनी होणारी आंबील यात्रा साजरी होण्याची चिन्हे नाही. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कर्नाटक येथील सौंदत्ती यात्रा भरते. कोरोनामुळे पहिल्यांदाच यात्रा रद्द झाली आहे. सध्या खंडोबाचा चंपासष्टी उत्सव सुरू आहे. 'येळकोट येळकोट जय मल्हार' असा जयघोष करत जुन्या मंदिरात उत्सव साजरा होतो. शनिवार पेठेतील खोलखंडोबा मंदिर ऐतिहासिक परंपरा आहे. अन्य मंदिरात देवाचे दर्शन समोरासमोर होते. येथे पायऱ्या उतरून उत्सवमूर्तीचे दर्शन घ्यावे लागते. दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्सव साजरा होतो. पालखीच्या दिवशी परिसराला उत्सवाचे स्वरूप होते. फुलांच्या पायघड्या, रांगोळया घालून उत्सव साजरा होतो. यंदा मात्र मंदिराभोवतीच मोजक्‍या भाविकांच्या उपस्थितीत पालखी काढण्याचे नियोजन आहे. 
शिवाजी पेठेतील खंडोबा मंदिराला मोठी परंपरा आहे. शहराच्या विविध भागातून लोक येथे खंडोबाच्या दर्शनासाठी येतात. खंडोबा देवाल मित्र मंडळाचे कार्येकर्ते आठ दिवस परिश्रम घेतात. मोजक्‍या लोकांसाठीच कार्यकर्त्यांनी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून भाविक दर्शनासाठी येत आहेत. वेताळ देवाचा पालखी सोहळा काल साध्या पद्धतीने साजरा झाला. काही दिवसात फिरंगाई देवीचा पालखी सोहळा आहे. तो ही साध्या पद्धतीने होईल. सोहळा डोळ्यात टिपण्यासाठी भाविक गर्दी करतात. तटाकडील तालीम मंडळाच्या वतीने दत्त पालखी सोहळा होतो. उत्तरेश्‍वर पेठेतील काळभैरवाचा पालखी सोहळाही मोठ्या उत्साहात साजरा होता. या सोहळ्यांना जुनी परंपरा आहे. 
कोरोनामुळे राज्यभरातील मंदिरे बंद होती. दिवाळीत ती खुली झाली नंतर प्रत्यक्ष दर्शनास सुरवात झाली. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी जत्रा यात्रांवर अद्याप बंदी आहे. 


जल्लोषापेक्षा कोरोना हद्दपार महत्वाचे 
दोन चार महिन्यांनी महापालिका निवडणूक होत आहे. निवडणूक म्हटल्यांवर पालखी सोहळे जल्लोषात साजरे झाले असते मात्र जल्लोषापेक्षा कोरोना हद्दपार होणे गरजेचे आहे हेच कार्यकर्त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

SCROLL FOR NEXT