coronavirus infection for more four person in kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापुरला दिवसात दुसरा धक्का ; आणखी चार जणांना कोरोनाची लागण

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - आज सकाळीच चार जणांचे कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आल्यानंतर आताही आणखी चार जणांचे आहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आज दिवसभरात रूग्णांची संख्या आठ झाली आहे. हे रूग्ण करवीर, पन्हाळा आणि शाहूवाडी येथील असल्याचे सीपीआरच्या वैद्यकीय सुत्रांनी सांगितले आहे. आज सापडलेल्या आठ रूग्णांसह आता जिह्यातील संख्या ४३ वर पोहोचली आहे. गेल्या पाच दिवसात कोल्हापुरात रोजच कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने जिल्हावासियांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.   

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


आता कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आलेल्या रूग्णांपैकी मोहरे व जाखले (ता. पन्हाळा) आणि एरंडपे (ता. भुदरगड) येथील आई व मुलगा असे एकूण 4 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कोल्हापूरमध्ये आज (17 मे 2020 ) एका दिवसात 8 जण कोरोना झाला आहे. 

सकाळी एरंडपे तालुका भुदरगड येथील एक रुग्ण सापडला आहे त्या रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे त्याची पत्नी व त्याचा मुलगा यांनाही कोरणा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

हे पण वाचा - धक्कादायक ; शाळेतून घरी गेला अन्‌ पॉझिटिव्ह झाला ; कसा घडला हा प्रकार

  
एरंडपे येथील या 27 वर्षाच्या महिलेने मुंबई ते गारगोटी प्रवास केला आहे. तिचा पाच वर्षांचा मुलगा सोबत असून तोही कॉरोना पॉझिटिव आला आहे.
 तर 26 वर्षाच्या तरुणाने पालघर ते पन्हाळा असा प्रवास केला असून 28 वर्षाच्या पुरुषाने अंबरनाथ ते कोल्हापूर असा प्रवास केलेला आहे. पालघर ते पन्हाळा असा प्रवास केलेल्या एकूण आठ व्यक्ती आहेत. त्यापैकी पाच जणांचा रिपोर्ट निगेटिव आला आहे तर अन्य दोघांचे अहवाल प्राप्त व्हायचे आहेत, यापैकी एक जण पॉझिटिव आला आहे.

दरम्यान आज सकाळी सापडेल्या रूग्णांमध्ये सोलापुरातून प्रवास करून कोल्हापुरात आलेल्या महिलेसह शाहूवाडीतील एक तरूण, तर भुदरगड मधील एका पुरुषाचा समावेश आहे. त्यांच्याशिवाय आजऱ्यातील एका पुरुषाचाही समावेश आहे. या तिघांनीही मुंबईवरून प्रवास केला आहे. हे चौघेही सीपीआर रूग्णालयांमध्ये कोरोना विलगीकरण कक्षात ऍडमिट होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT