Coronavirus infection in three members of the same family at kolhapur 
कोल्हापूर

ब्रेकिंग - कोल्हापुरात 'त्या' एकाच कुटुंबातील तिघांना कोरोनाची लागण 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - शहरात गेल्या दोन दिवसात तीन कंटेनमेंट झोनची वाढ झाली आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ थांबलेली नसल्याने पॉझिटीव्ह रुग्ण सापडेल ठिकाणी आता कंटेनमेंट झोन करुन कोरोना प्रसार थांबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. महापालिकेची यंत्रणा पॉझिटीव्ह रुग्ण सापडताच तातडीने कामाला लागली आहे. विशेषता राजोपाध्यायनगर एकाच कुटूंबातील तिघाजणांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे. या परिसरात अधिक खबरदारी घेतली जात आहे. 

राजोपाध्यायनगरमध्ये कंटेनमेंट झोन 
शहरातील एक प्रमुख उपनगर असलेल्या राजोरापाध्यायनगरमध्ये मंगळवारी रात्री एक पॉझिटीव्ह रुग्ण आढळला होता. या रुग्णांच्या संपर्कात आलेले आणखीन तिघेजणही पॉझिटीव्ह आले आहेत. हे तिघेही एकाच कुटूंबातील आहेत. त्यामुळे येथे कोरोना रुग्णांची संख्या आणखीन वाढतेय की काय?अशी भीती आता निर्माण होत आहे. नव्याने सापडलेले तीन रुग्ण आणखीन कोणाकोणाच्या संपर्कात आले आहेत. याची तपासणी महापालिकेची यंत्रणा करत आहे. येथे तातडीने कंटेनेमंट झोन तयार करण्यात आला. त्याचबरोबर नागरिकांमध्ये प्रबोधन करण्यात आले. महापालिकेच्या आरोग्य विभागाने येथे तातडीने औषधफवारणी केली आहे. घरोघरी जाउन सर्व्हेक्षणाचे कामही हाती घेण्यात येणार आहे. एकाच कुटूंबातील हे रुग्ण सापडल्याने येथे भीतीचे वातावरण असून हे रुग्ण आणखीन कोणा कोणाच्या संपर्कात आले आहेत का? याची तपासणी आता महापालिका प्रशासनाकडून केली जात आहे. आज सापडलेले रुग्ण हे एकाच कुटूंबातील आहेत. त्यांची सर्व हिस्ट्री घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. ते तिघेजण कोणाच्या संपर्कात आहेत. कुठे जाउन आले आहेत का? याची तपासणी आता केली जात आहे.

दरम्यान, गेल्या पंधरा दिवसात कोरोनाग्रस्तांच्या वाढत्यासंख्येने कहर केला आहे. कालच जिल्ह्यात कोरोना रूग्णांच्या संखेने एक हजारांचा टप्पा ओलांडला आहे. कोरोना पॉझिटिव्हची संख्या 1 हजार 23 इतकी झाली.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd T20I: इशान किशन, सूर्यकुमार यादव यांची चौफेर फटकेबाजी; दणदणीत विजयासह भारताची मालिकेत २-० अशी आघाडी

Beed News : महावितरणचा महाझटका; चुकीच्या रीडिंगचा शॉक, ग्राहकांचे कंबरडे मोडले; हजार रुपयांचे बिल थेट ७० हजारांवर कसे?

Maharashtra Education : महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षणाचे केंद्र बनवण्यासाठी विद्यापीठांची तयारी : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मोठी बातमी! राज्यात २७०० केंद्रप्रमुखांची भरती; ३ व ४ फेब्रुवारीला ऑनलाईन परीक्षा; अडीच वर्षांपूर्वी ४५००० उमेदवारांनी भरले होते ४.२७ कोटी परीक्षा शुल्क

IND vs NZ 2nd T20I: इशान किशनचं वादळ... ११ चौकार अन् ४ षटकार! सूर्या दादासोबत १२२ धावांची भागीदारी अन्...

SCROLL FOR NEXT