Kolhapur Shree Ambabai Temple
Kolhapur Shree Ambabai Temple esakal
कोल्हापूर

Kolhapur Ambabai Temple : कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनाला जाताय? मग, 'हा' नियम पाळावाच लागेल!

सकाळ डिजिटल टीम

देशात विमानतळांवर नियमावली लागू करण्यात आल्यानंतर आता मंदिरांनाही अलर्ट देण्यात आला आहे.

Coronavirus Update : जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील, चीन आणि अमेरिकेत कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. कोरोनानं पुन्हा डोकं वर काढल्यानं चिंता वाढल्या आहेत. चीनमध्ये (China Coronavirus) कोरोनानं पुन्हा एकदा कहर सुरु केला आहे, त्यामुळं मृतांचा आकडा वाढत आहे.

देशात विमानतळांवर नियमावली लागू करण्यात आल्यानंतर आता मंदिरांनाही अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरातील (Kolhapur Shree Ambabai Temple) कर्मचाऱ्यांना मास्क (Mask) सक्ती करण्यात आली असून, शिर्डीतील साईबाबा (Shirdi Saibaba) मंदिरात भाविकांना मास्क वापरण्यासह सोशल डिस्टन्सिंगचं नियम पाळण्याचं आवाहन करण्यात आलंय.

याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडूनही राज्य शासनाला सतर्कतेचे आदेश देण्यात आल्यानंतर कोल्हापूर विमानतळ प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधक नियमावलीची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झालीये.

दरम्यान, देश-विदेशातील हजारो भाविक, पर्यटक दररोज करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येत असल्यामुळं कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रथम मंदिरातील कर्मचाऱ्यांना मंदिरात मास्क वापरण्याच्या सूचना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून (West Maharashtra Temple Management Committee) देण्यात आल्या आहेत, तर भाविकांसाठी अजून कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नायकवडी यांनी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लॅन बी काय आहे? अमित शाह काय म्हणाले जाणून घ्या...

IPL 2024: हैदराबादनेही प्लेऑफचं तिकीट केलं पक्कं! आता RCB vs CSK सामना लावणार चौथ्या संघाचा निकाल, पाहा कसं आहे समीकरण

Devendra Fadanvis: लोकसभेनंतर आता फडणवीसांनी सांगितलं विधानसभेचं गणित; मुख्यमंत्रीपदाबाबत केलं मोठं वक्तव्य

Char Dham Yatra 2024: सावधान नाहीतर रीलच्या नादात जाल जेलमध्ये...उत्तराखंड सरकारने घेतला मोठा निर्णय, अधिकारी तळ ठोकून

Nepal Bans: आता नेपाळनेही MDH, EVEREST मसाल्यांवर केली मोठी कारवाई; आयात आणि विक्रीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT