corporation election in apposed in ichalkaran three leaders win in ichalkaranji kolhapur 
कोल्हापूर

इचलकरंजीत सभापती निवड बिनविरोध ; तीन नेत्यांची सत्ता मात्र कायम

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी (कोल्हापूर) : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या येथील पालिकेच्या विविध विषय समित्यांच्या नूतन सभापतीपदाच्या निवडी बिनविरोध पार पडला. अपेक्षेप्रमाणे आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर व राष्ट्रवादीचे नेते मदन कारंडे यांची पालिकेतील सत्ता कायम राहिली. जोरदार फिल्डींग लावूनही ताराराणी आघाडी सत्तेमध्ये परतण्यास अपयशी ठरली. 

प्रतिष्ठेच्या बांधकाम समितीच्या सभापतीपदी राजर्षी शाहू आघाडीचे उदयसिंह पाटील यांची तर पाणी पुरवठा सभापतीपदी आवाडे गटाचे दीपक सुर्वे यांची वर्णी लागली. चौघामध्ये अत्यंत चुरस असतानाही आवाडे गटाचे संजय केंगार यांची अनपेक्षीतपणे आरोग्य सभापतीपदाची लॉटरी लागली आहे. शिक्षण समिती सभापतीपदी भाजपचे मनोज साळुंखे यांची तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी भाजपच्याच सारीका पाटील यांची तर उपसभापतीपदी राजर्षी शाहू आघाडीच्या सुनिता शेळके यांची निवड झाली. 

दरम्यान, स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्षा सौ.अलका स्वामी व नियोजन आणि विकास समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांची निवड झाली. दोन्ही पदसिध्द पदे आहेत. या शिवाय स्थायी समितीच्या सदस्यपदी आवाडे गटाचे शकुंतला मुळीक, भाजपचे युवराज माळी व ताराराणी आघाडीचे सागर चाळके यांना संधी मिळाली. निवडीवेळी विरोधी राष्ट्रवादी कॉंग्रेस (जांभळे गट), ताराराणी आघाडी व कॉंग्रेसमधील एक गट अनुपस्थीत होता. 

घोरपडे नाट्यगृहात प्रांताधिकारी विकास खरात यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्या उपस्थीतीत निवडीची प्रक्रिया पार पडली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त सज्ज ठेवण्यात आला होता. निवडीनंतर सर्वच सभापतींच्या समर्थकांनी गुलांलाची उधळण करीत एकच जल्लोष केला. 

राजर्षी शाहू आघाडीचा त्याग 

राजर्षी शाहू आघाडीकडे दोन, आवाडे गटाला दोन व भाजपला एक अशा समिती यापूर्वीच्या तडजोडीनुसार वाट्याला येणार होती. मात्र आवाडे गटाला महत्व आल्यामुळे त्याचा फायदा घेत भाजपकडील वजनदार आरोग्य समिती पदरात पाडून घेतली. तर राजर्षी शाहू आघाडीने आपल्याकडील शिक्षण समिती भाजपला दिली. तर भाजपला आरोग्य ऐवजी महिला व बालकल्याण समिती मिळाली.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT