The corpse will not have to be left in the open until the guest arrives; Read detailed
The corpse will not have to be left in the open until the guest arrives; Read detailed 
कोल्हापूर

पाहुणे येईपर्यत मृतदेह उघड्यावर ठेवावा लागणार नाही ; वाचा सविस्तर

सदानंद पाटील

कोल्हापूर  : जिल्हा नियोजन मंडळाकडून नावीण्यपूर्ण योजनेतून दोन वर्षापूर्वी शीतशवपेटी घेण्याचा निर्णय झाला. जिल्हा नियोजन मंडळाने 35 लाखांची तरतूद केली तर तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाच लाख रुपयांचा धनादेश दिला. मात्र या शीत शवपेटीच्या तांत्रिक बाबी, त्याला राज्याच्या आरोग्य विभागाची मान्यता घेण्यात विलंब झाला. त्यामुळे हा निधी परत जाणार की काय?, अशी परिस्थिती होती. मात्र जिल्हा नियोजन विभागाने अखेरपर्यंत पाठपुरावा करत हा विषय मार्गी लावला. आज सहा गावांत या शवपेटी पुरविल्या आहेत. उर्वरित गावांतही दोन दिवसांत या शवपेटी बसवण्याचे नियोजन आहे. 
जिल्ह्यात दुर्गम तालुक्‍यांची संख्या मोठी आहे. अनेक गावे ही डोंगर, वाड्या, वस्त्यांत आहेत. त्या ठिकाणी आरोग्य सुविधांचीही वाणवा आहे. बऱ्याचवेळा ग्रामीण भागात मृत्यू झाला तर नातेवाईक येईपर्यंत मृतदेह ठेवायचा कुठे? असा प्रश्‍न निर्माण होतो. मृतदेहावर वेळेत अंत्यसंस्कार झाले नाहीतर अनेक प्रश्‍न निर्माण होतात. बऱ्याचवेळा जवळचे नातेवाईक हे इतर जिल्ह्यातून, परराज्यातून किंवा विदेशातून येतात. अशावेळी मृतदेहाला उघड्यावर ठेवता येत नसल्याने एखाद्या हॉस्पिटलमध्ये ठेवावा लागतो. मात्र पुन्हा तो मृतदेह एका ठिकाणाहून दुसरीकडे न्यावा लागतो. या सर्व अडचणींचा विचार करुन शीतशवपेटी खरेदीचा निर्णय झाला. 


या गावांना मिळणार शीतशवपेट्या 
पुलाची शिरोली, जयसिंगपूर, कुरुंदवाड, सावर्डे, भादोले, हुपरी येथे शवपेटी बसवली आहे. तर निवडे, कळे, भेडसगाव, बांबवडे, उत्तूर, कडगाव, कोवाड, हलकर्णी, इस्पुर्ली, कापशी या ठिकाणी दोन दिवसांतही शीतशवपेटी बसवली जाणार आहे. 
.. 
नावीण्यपूर्ण योजनेतून शीतशवपेटी योजना घेण्यात आली. निधी कमी पडत असताना तत्कालीन पालकमंत्र्यांनी काही निधी दिला. मात्र योजनेची अंमलबजावणी करताना अडचणी आल्या. बराच पत्रव्यवहार करावा लागला. मात्र आता या शवपेट्या संबंधित गावात पोहोचत असल्याने नावीण्यपूर्ण योजना राबवल्याचे समाधान आहे. 
- सरिता यादव, जिल्हा नियोजन अधिकारी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT