चित्रपट महामंडळ sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : चित्रपट महामंडळात भ्रष्टाचार

धनाजी यमकर ; धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे दाद मागणार

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : गेल्या पाच वर्षांत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात(Akhil Bharatiya Marathi Chitrapat Mahamandal) लाखोंचा भ्रष्टाचार(Corruption) झाला आहे, लेखापरीक्षण जुळत नाही, कार्यकारिणीची मंजुरी न घेता ठेवी मोडल्या आहेत, नवीन घटना मंजूर झालेली नसताना त्याआधारे बेकायदेशीर कामकाज केले आहे. याविरोधात आवाज उठवून आम्ही धर्मादाय आयुक्त (Charity Commissioner)कार्यालयाकडे दाद मागू व कार्यालय उघडण्याचा निर्णय घेऊ, अशी माहिती उपाध्यक्ष धनाजी यमकर यांच्यासह विद्यमान संचालकांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

महामंडळाच्या कार्यकारिणीची मुदत संपून सहा महिने झाले असले तरी १३ महिन्यांपासून कार्यकारिणीची बैठक झालेली नाही. सर्वसाधारण सभा झालेली नाही. अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्याकडे मागणी केल्यानंतरदेखील त्यांनी याची दखल न घेतल्याच्या निषेधार्थ १ जानेवारीला महामंडळाच्या कार्यालयाला टाळे ठोकले. या घटनेला १७ दिवस झाले तरी अध्यक्ष कोल्हापुरात येत नाहीत, बैठक लावून चर्चा करायला तयार नाहीत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यमकर म्हणाले, ‘‘अध्यक्षांनी स्वत:च्या प्रसिद्धीसाठी महामंडळाचा वापर करून घेतला आहे. कोल्हापूरला दुय्यम वागणूक देत पुण्यातून कारभार केला जात आहे. मी पुण्यात राहून कोल्हापूरचे ऑफिस उघडून दाखवतो अशी गुर्मीची भाषा वापरून गुंड, राजकीय पक्षांकडून धमकी दिली जात आहे.’’

रणजित जाधव म्हणाले, ‘‘कार्यकारिणीची बैठक न झाल्याने अनेक निर्णय प्रलंबित आहेत. स्टेशन रोडवरील कार्यालयाचे काम रखडले आहे. कोरोना काळात कलावंतांच्या मदतीसाठी मोठमोठ्या कलाकारांकडून महामंडळाकडे ४० लाखांपर्यंतची रक्कम जमा झाली. त्याचा हिशेब नाही. ७०-८० लाख रुपये मी वाटले असे अध्यक्ष म्हणत आहेत. हे पैसे कुठून आले याचा हिशेब त्यांनी द्यावा.’’माजी अध्यक्ष विजय पाटकर म्हणाले, ‘‘मी ३५ वर्षे महामंडळाचा सभासद आहे. पहिल्यांदा कार्यकारिणीतल्या संचालकांनाच अध्यक्षांच्या विरोधात जावे लागले आहे. भ्रष्टाचाराच्या पलीकडे यांनी व्यवहार केले आहेत.’’

माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे म्हणाले, ‘‘आमच्या कार्यकारिणीने कोणताही भ्रष्टाचार केलेला नसताना खोटा आरोप करून १४ जणांचे संचालकपद रद्द केले. पाच वर्षांत ३०० निर्मात्यांचे अनुदान थकले आहे, अनेक लवाद थांबले आहेत.’’पत्रकार परिषदेला सतीश बिडकर, सतीश रणदिवे,पीतांबर काळे, मिलिंद अष्टेकर यांच्यासह संचालक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

CA Result Success Story: रोज आठ ते दहा अभ्यासात जीव ओतून जिद्द व चिकाटीच्या जोरावर गेवराईच्या पृथ्वीराजचे 'सीए'परीक्षेत यश

SCROLL FOR NEXT