CPR Hospital Sakal
कोल्हापूर

स्तनदा मातांचे दूध दानासाठी समुपदेशन

मातृ दुग्धपान दिवसाचे औचित्य; सीपीआरमध्ये बँकेतून गरजू बाळांना मिळेल मातेचे दूध

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - विविध कारणांनी मातेच्या दुधापासून वंचित बालकांसाठी स्तनदा मातांना स्वतःचे दूध दान करता येणार आहे. स्तनदा मातांनी अतिरिक्त दूध दान केल्यास दूध कमी होत नसून तेवढ्याच क्षमतेने पुन्हा दूध निर्माण होते. मात्र दुग्धदानातून अमुल्य अशा वात्सल्याची अनुभती स्तनदा मातांना घेता येणार आहे. त्यासाठी सीपीआरमध्ये स्थापन झालेल्या अमृतधारा दुग्ध पेढीत स्तनदा मातांसाठी समपुदेशनाची सुविधा सुरू असल्याची माहिती दुग्धपेढीच्या समन्वयक अधिकारी डॉ. दीपा फिरके यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

मातृ दुग्धपान दिनाच्या पार्श्‍वभूमीवर डॉ. फिरके म्हणाल्या, ‘‘नोकरी करणाऱ्या महिलांची बाळं, आजारी महिला किंवा जन्मदातीपासून उपचारासाठी स्वतंत्र ठेवलेली बाळांना आईचे दूध वेळीच मिळत नाही किंवा पुरेसे मिळत नाही. अशा बाळांना स्तनदामातांनी दान केलेले दूध देता येणार आहे.’’ त्या म्हणाल्या, ‘‘पुराणकाळात काही मातांनी आपण जन्म न दिलेल्या बाळाला दूध पाजल्याच्या नोंदी आहेत. त्याच वाटेवरून जाताना सायन येथे आशिया खंडातील पहिला ह्युमन मिल्क बॅंक १९८९ ला डॉ. फर्नांडिस यांच्या पुढाकाराने सुरू झाली. पाठोपाठ सीपीआरमध्येही अमृतधारा दुग्धपेढी सुरू झाली. पेढीत स्तनदा मातांनाही दूध दान करता येणार आहे.’’

दान केलेले दूध निर्जंतुकीकरण केले जाते. अतिदक्षता विभागात कमी दिवसाच्या व कमी वजनाच्या बाळांना दूध दिले जाते. अशा शुद्ध दुधामुळे जंतुसंसर्ग व गुंतागुंतीच्या आजारांचे प्रमाण कमी होऊन बाळांची प्रकृती सुधारते. त्यामुळे बालमृत्यूचा दर कमी होतो, असेही फिरके यांनी सांगितले.

जनजागृती करणार

सीपीआर रुग्णालयात अमृतधारा दूध पेढीत जागतिक दुग्धपान दिनानिमित्त जवळपास सहा स्तनदा मातांनी दूध दान दिले. त्यामुळे सीपीआरमध्ये उपचार घेणाऱ्या काही बालकांना दूध देता आले. अशाच प्रकारे स्तनदा मातांना दूध दान करता येणार आहे. तरी तंदुरुस्त स्तनदा मातांनी दूधदान करावे याबाबत सीपीआरतर्फे जागृती करण्यात येत आहे.

स्तनदा मातांत अनाठायी भीती

दूध दान केल्याने दूध कमी होईल किंवा माझ्या बाळाला दूध कमी पडेल, अशी शंका स्तनदा मातांना असते. दूध दान केल्याने ते कमी होत नाही तर जास्त दूध येते. तिच्या बाळाला दूध पाजल्यानंतरही मातेला भरपूर दूध येते. यांसह अन्य शंकांचे समाधान करण्यासाठी अमृतधारा दुग्‍धपेढीत समुपदेशन होणार असल्याचे डॉ. फिरके यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

Pune: पुण्यातील शाळेत तंत्रज्ञान शिक्षणाला चालना मिळणार; प्राथमिक विद्यार्थ्यांना रोबोटिक्सचे धडे

Devendra Fadnavis Virar : "वसई-विरारमधील एकाही गरिबाचे घर तोडू देणार नाही"; देवेंद्र फडणवीसांचे मोठे आश्वासन!

Pune Election Bribery : पुण्यात संक्रांतीच्या नावाखाली मतांची खरेदी; प्रशासनाच्या डोळ्यावर पट्टी!

SCROLL FOR NEXT