couple burned in their sleep Death of both belgaum crime news 
कोल्हापूर

भयानकच : दांपत्याला झोपेतच जाळले; दोघांचाही मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

अथणी (बेळगाव)  : कोकटनूर (ता. अथणी) येथील एका दांपत्याला झोपेत असतानाच पेटविले आहे. तीन दिवसापूर्वी ही घटना घडली असून त्यात पती, पत्नीचा मृत्यू झाला आहे. रेखा महादेव मादर (वय 45) व तिचा पती महादेव सीताराम मादर (वय 50) अशी मृत झालेल्या दांपत्याची नावे आहेत. ऐगळी पोलिस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, 
गुरूवारी (ता. 11) मध्यरात्री रेखा महादेव मादर व महादेव सीताराम मादर हे दांपत्य झोपेत असताना त्यांच्यावर रॉकेल ओतून पेटविले. गंभीर जखमी अवस्थेते मादर दांपत्याला उपचारासाठी हुबळी येथील किम्स रूग्णालयात दाखल केले होते. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. 12) पत्नी रेखा मादर हिचा मृत्यू झाला. त्यानंतर महादेव याच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्याचा काहीही फायदा न होता रविवारी (ता. 14) त्याचाही मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीनंतर महादेव याच्या पार्थिवावर कोकटनूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

चौकशीसाठी पाच संशयित ताब्यात

भाऊबंदकी व कौटुंबीक वादातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पाच संशयितांना ऐगळी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मात्र त्यांची नावे समजू शकली नाहीत. ऐगळी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तपासानंतर घटनेमागील सत्य उघडकीस येणार आहे. मयत मादर दांपत्याच्या मागे दोन मुलगे, चार मुली असा परिवार आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

अथणी तालुक्‍यात भीतीचे वातावरण

कोकटनूर येथील पती-पत्नीच्या मृत्यूची माहिती सर्वत्र पसरली आहे. त्यामुळे अथणी तालुक्‍यात भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रत्येक जण व सोशल मिडीयावर या घटनेची चर्चा करताना दिसत आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुणे शहर ठप्प! पावसाने रस्ते जलमय, प्रमुख चौकांमध्ये वाहतूक विस्कळित

Mumbai Agra Highway : मुंबई-आग्रा महामार्गावरील 'या' कोंडीतून होणार कायमची सुटका! राणेनगरमध्ये नक्की काय बदलणार? पाहा महत्त्वाची अपडेट

ICC Ranking: जसप्रीत बुमराहला जबरदस्त धक्का... मॅट हेन्रीने न्यूझीलंडचा ३६ वर्षांचा दुष्काळ संपवला; Joe Root पुन्हा टॉपर ठरला

Kolhapur Football : विषय हार्ड, लय भारी...; फिफाने घेतली कोल्हापूरच्या फुटबॉलची दखल, रोनाल्डो, नेमारच्या फोटोंना दिल्या मराठी कमेंट

लग्नपत्रिकेवर वधु-वरांची जन्मतारीख बंधनकारक, राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT