covid 19 impact Campus placement story kolhapur result was thousands of students studying in the district
covid 19 impact Campus placement story kolhapur result was thousands of students studying in the district 
कोल्हापूर

महाविद्यालयासह विद्यार्थ्यांना फटका : कॅम्पस प्लेसमेंटवर कोरोनाचे संकट

आकाश खांडके

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्चमध्ये लॉकडाऊन पुकारला. दरवर्षी याच काळात विविध महाविद्यालयात कॅम्पस प्लेसमेंट प्रक्रिया असते. विविध कंपन्या महाविद्यालयांना भेट देऊन प्रक्रियेनुसार सक्षम विद्यार्थ्यांना नोकरीसाठी निवडतात. यंदा लॉकडाऊनमुळे भेट देणाऱ्या कंपन्यांच्या संख्येत घट झाली आहे. याचा फटका सर्वच शाखेच्या विद्यार्थ्यांना बसला आहे. मंदीमुळे मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना याची जास्त झळ बसली आहे.  


दरवर्षी अंतिम वर्षाचे विद्यार्थी कॅम्पस प्लेसमेंटची वाट बघतात. येणाऱ्या कंपन्या होतकरू विद्यार्थ्यांना विविध पदांवर नियुक्त करतात. सरासरी दीड ते पाच लाख प्रतिवर्षं असे पॅकेज कंपन्यांद्वारे दिले जाते. यंदा कोरोनामुळे कंपन्यांच्या संख्येत घट झाली आहे. याचा थेट परिणाम जिल्ह्यात शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांवर झाला आहे.


दरवर्षी पंचाहत्तरहून अधिक कंपन्या महाविद्यालयाला भेट देतात, ३५० हून अधिक विद्यार्थ्यांना थेट लाभ होतो. या वर्षी चित्र निराळे आहे. मार्चपर्यंत २५६ विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली. मात्र त्या नंतर पूर्ण प्रक्रियाच ठप्प झाली. मागील दोन तीन वर्षांच्या तुलनेत या वर्षी नोकरी भरतीत २० टक्के घट झाली आहे. याचा मोठा फटका मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना बसला आहे. याचे मूळ कारण असे की मेकॅनिकलच्या कंपन्या एप्रिल-मे महिन्यात नोकरी नियुक्तीला प्राधान्य देतात. या शाखेचे दरवर्षी ५० टक्के विद्यार्थी नियुक्त होतात, हा आकडा घसरून २५ टक्‍क्‍यांवर आला आहे.

नोकरी असूनही घरी बसण्याची वेळ
कोरोना काळात काही कंपन्यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा होण्याआधीच अभियंत्यांना काम सुरू करण्यास परवानगी दिली आहे तर काही कंपन्यांनी पदवी मिळेपर्यंत नियुक्तीची प्रक्रिया थांबवली आहे. त्यामुळे नोकरी हातात असून ही अभियंत्यांवर घरी बसण्याची वेळ आली आहे.

संपादन - अर्चना बनगे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT