covid 19 impact for farm labor on Wrestler 
कोल्हापूर

शड्डू ठोकणारा लालमातीतला पैलवान राबण्यासाठी काळ्यामातीत

मतीन शेख

कोल्हापूर : त्याने कुस्तीच्या फडात एक शड्डू ठोकला, की शौकिनांच्या नजरा त्याच्याकडे वळायच्या. ‘व्वा काय शड्डू मारतंय पोरगं’ असं म्हणत त्याचं कौतुक व्हायचं. कोथळी (ता. शिरोळ) येथील पैलवान भरतकुमार पाटीलने कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यात नाव केलं. पैलवानकीसह त्याने मिमिक्रीची कलाही जोपासली. या दोन कलेच्या आधारेच त्याची वाटचाल सुरू होती; परंतु कोरोनाने त्याची ससेहोलपट सुरू झाली. कुस्तीचे फड, तसेच हास्य कार्यक्रम बंद असल्याने शेतमजुरीची वेळ त्याच्यावर आली आहे. 


‘आला बघा कोथळीचा भरतकुमार, कसा दणदणीत शड्डू 
ठोकतोय’ असा निवेदकाचा आवाज खासबाग मैदानावर अनेकदा घुमला; परंतु सध्या त्याचा शड्डू क्षीण झाला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवारांपासून ते नरेंद्र मोदींपर्यंत आणि निळू फुलेंपासून ते मकरंद अनासपुरेपर्यंतच्या व्यक्तींची हुबेहूब नक्कल तो सादर करतो. घरची गरिबी, वडिलांचे छत्र लहानपणीच हरपलेले. आई, लहान भावासह भरतचा जगण्याचा संघर्ष सुरू होता. 

आठवीत असताना तो कुस्तीकडे वळला. शालेय स्पर्धा, तसेच कुंडल, बलवडी, पुणे, नगर येथील प्रसिद्ध मैदाने त्याने जिंकली. त्यातील बक्षिसी आणि हास्य कलाकाराचे मानधन यावरून त्याचे जगणे सुरू होते. ‘हसा पण जोरात’ हा दीड तासाचा कार्यक्रम तो सादर करतो. त्याने आजअखेर ११५२ प्रयोग केले आहेत. कुस्ती आणि कला रसिकांची मने जिंकणाऱ्या भरतकुमारवर कठीण वेळ आली आहे.

जगण्याची दोन्ही साधने बंद झाल्याने त्यावर शेतमजुरीची वेळ आली आहे. शड्डू ठोकणारे, माईक धरणाऱ्या हातात फावडे अन्‌ विळा आला आहे. दिवसाला ३०० रुपये हजेरीने तो राबत आहे. हजारोंत बक्षीस घेणारा पैलवान अन्‌ मराठी वाहिन्यांवरून घराघरात पोहचलेला कलाकार कोरोनामुळे अडचणीत आहे. हे संकट दूर होत कुस्ती आणि सार्वजनिक कार्यक्रम लवकर सुरू होण्याची तो वाट पाहत आहे.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: पावसामुळे फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर

Plane Service : इराण युद्धाचा विमानसेवेला फटका; दहा हजार आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द

Chhatrapati Sambhajinagar: गॅससाठी नागरिकांच्या रांगा कायम; आठ दिवसांत प्रश्न सुटू शकतो, पण पुरवठा वाढवा ः एजन्सी

Mugdha Karnik Controversy: अभिनेत्री मुग्धा कर्णिक यांनी माफी मागावी; श्री विठ्ठल भक्तांविषयी वादग्रस्त वक्तव्य, मंदिर समितीचे पत्रक प्रसिद्ध!

Chhatrapati Sambhajinagar: कांदा अवघा ७०० रु. क्विंटल; शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघेना, हमीभाव देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT