covid hospital will be set up at Mahasainik Darbar Hall kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापुरात 'या' ठिकाणी होणार 150 बेडचे रुग्णालय ; प्रशासन करणार जय्यत तयारी...    

डॅनिअल काळे

कोल्हापूर - कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्ग वाढू लागल्यामुळे प्रशासनाने बेड वाढवण्याची जबाबदारी घेतली आहे.विविध खासगी हॉस्पिटल सुरु करण्यासोबतच सार्वजनिक स्वरूपात तयारीही केली जात आहे. कोल्हापूर महापालिका आयसोलेशन येथे ६० बेडचे रुग्णालय उभा करत आहे. त्यासोबतच महासैनिक दरबार हॉल याठिकाणी आणखीन दीडशे बेडचे रुग्णालय तयार करण्यात येणार आहे.

कोल्हापूर जिल्हा प्रशासन कोल्हापूर महानगरपालिका क्रेडाई आणि रोटरी क्लब यांच्या सोबतीने प्रशासन हे काम करत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत जाईल तशी गंभीर परिस्थिती तयार होत आहे. या काळात उपचाराविना रुग्णांचे हाल होऊ नयेत यासाठी प्रशासन ही तयारी करत आहे. महासैनिक दरबार हा हॉल मोठा आहे. याचा परिसरही मोठा आहे. सर्वच दृष्टीने येथे हॉस्पिटल केले तर प्रशासनाला ते सोयीचे ठरणार आहे.त्यामुळे कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर मल्लिनाथ कलशेट्टी यांनी यासाठी बांधकाम व्यावसायिकांची संघटना क्रेडाई,रोटरी क्लब यांच्यासोबत चर्चा केली आहे. 

येत्या आठ दिवसात येथे बेडची व्यवस्था केली जाईल अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली. त्यासोबतच आयसोलेशन येथील साठ बेडची व्यवस्था झाली आहे. येत्या चार दिवसात हे काम सुद्धा पूर्ण होणार आहे.

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT