covid patient 1000 cross in ichalkaranji city 30 patient in death
covid patient 1000 cross in ichalkaranji city 30 patient in death 
कोल्हापूर

इचलकरंजीत रुग्णसंख्या हजारच्या पुढे ; मृतांचे अर्धशतक पार

पंडित कोंडेकर

इचलकरंजी (कोल्हापूर) :  शहरात  कोरोना रुग्णांच्या संख्येने हजाराचा आकडा पार केला. तर कोरोना संसर्गाने दगावणार्‍या रुग्णांच्या संख्येने अर्धशतकाचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, काल दिवसभरात नवीन 31 रुग्ण आढळले असून तीन रुग्ण दगावले आहेत. एकूण बाधीत रुग्णांची संख्या 1011 वर पोहचली आहे.


शहरात कोरोनाचा कहर सुरुच आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच आहे. सव्वा महिना झाल्यानंतरही समुह संसर्ग कमी झालेला नाही. दररोज सरासरी 35 च्या पुढे रुग्ण सापडत आहेत. तर दुसरीकडे शहर पूर्वपदावर आले असून पून्हा बाजारपेठेत गर्दी होतांना दिसत आहे. आज सकाळपासून नवे 31 रुग्ण आढळले. यामध्ये आणखी एक खासगी डॉक्टर बाधीत झाले आहेत. शहरातील विविध 24 परिसरातील हे रुग्ण आहेत. बालाजीनगर परिसरातील तिघेजण बाधीत आढळले आहेत. तर कोल्हापूर नाका व जूना चंदू रोड परिसरातील प्रत्येकी दोघांना संसर्ग झाला आहे. उर्वरीत सर्व परिसरात प्रत्येकी एका रुग्णांची नोंद झाली आहे.


शाहू कॉर्नर, वेताळ पेठ, आमराई रोड, सरस्वती मार्केट, इंदिरानगर, विक्रमनगर, शहापूर, पोवार माळ, मंगलधामसमोर, गणेशनगर गल्ली नं.6, सोमनाथ किराणा दुकान परिसर (जवाहरनगर), शांतीनगर, जयभिमनगर, दातार मळा, महासत्ता चौक, सहकारनगर, पंत मळा, जिजामाता मार्केट, शाहू हायस्कूलसमोर, सुतार मळा, गणपती बोळ (नदीवेस) या परिसरात प्रत्येकी एक नवा रुग्ण आढळून आला. 285 रुग्ण घरी परतले आहेत. तर अद्याप 675 रुग्ण उपचार घेत आहेत.
दरम्यान, आज आणखी तिघांचा मृत्यू झाला.

सातपूते गल्लीतील 75 वर्षीय वृध्दाचा कोल्हापूरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. सुतार मळ्यातील 74 वर्षाच्या वृध्दाचा आयजीएम रुग्णालयात उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. शिवाजीनगर पोलीस ठाणे परिसरातील 65 वर्षाची महिला दगावली. तिच्यावर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. यामुळे कोरोना संसर्गाने मयत झालेल्यांची संख्या आता 51 पोहचली आहे.

हेही वाचा- कोरोनाच्या भीतीने  स्तनपान न देणे धोकादायक -

पालिकेचा आरोग्य विभाग धास्तावला
पालिकेचे मुख्याधिकारी बाधीत झाल्यामुळे पालिकेचा आरोग्य विभागात धास्तावला आहे. गेली दीड महिने अखंडीतपणे या विभागाचे काम सुरु आहे. एकही दिवस सुट्टी न घेता आरोग्य अधिकारी डॉ.सुनिलदत्त संगेवार यांच्या नेतृत्वाखाली टीम कार्यरत आहे. आता या टीममधील दहाजणांनी आज खबरदारी म्हणून स्वॅब तपासणीसाठी पाठविला आहे. या सर्व स्वॅबच्या अहवालाकडे लक्ष लागले आहे. 

हेही वाचा- ...तरच कोल्हापुरातील कोरोना रूग्णांची संख्या होईल कमी - ​

पोलीस कर्मचारी बाधीत
शहापूर व वाहतूक शाखेपाठोपाठ आता गावभाग पोलीस ठाण्याकडील तीन पोलीस कर्मचारी व एक होम गार्ड बाधीत झाला आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य पोलीस कर्मचार्‍यांची माहिती घेण्याचे काम सुरु होते. बाधीतांमध्ये एक महिला कर्मचारी आहे.

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT