कोल्हापूर

‘सीपीआर‘ची मान्यता रद्द: आमदार आवाडे यांच्या माहितीने खळबळ

पंडीत कोंडकर

इचलकरंजी (कोल्हापूर) : मेडीकल कॉलेज सुरु करण्यात आल्यामुळे ‘सीपीआर‘ची जिल्हा रुग्णालयाची(CPR District Hospital) मान्यता रद्द झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात सद्या जिल्हा रुग्णालय नाही. त्यासाठी इचलकरंजीतील ‘आयजीएम‘(IGM District Hospital)ला जिल्हा रुग्णालयाची मान्यता देण्यासाठी मी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope)यांच्याकडे पाठपुरावा करीत आहे. पण यामध्येही इचलकरंजीला(ichlkarnji)जाणीवपूर्वक डावलण्यात येत आहे. दुसरे रुग्णालय सुरु करण्याची तयारी आहे. पण ‘आयजीएम‘ला जिल्हा रुग्णालय होवू न द्यायची भूमिका घेतली जात आहे, असा गंभीर आरोप आमदार प्रकाश आवाडे (mla prakash awadeयांनी आज ताराराणी पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केला.(cpr-district-hospital-de-recognized-information-by-mla-prakash-awade-kolhapur-news)

आमदार आवाडे यांनी आयजीएम रुग्णालय व यंत्रमाग उद्योगातील विविध प्रश्‍नावर आपली पून्हा एकदा भूमिका मांडली. जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांच्या दिशेने त्यांचा बोलण्याचा रोख होता. कोल्हापूरसह मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागलसाठी तसेच जयसिंगपूरसाठी लससाठा जास्त प्रमाणात मिळतो. पण इचलकरंजीत मोठी लोकसंख्या असतांनाही याबाबत अपेक्षीत सहकार्य केले जात नाही, अशी खंत व्यक्त करीत आमदार आवाडे यांनी ‘लसीसाठी आपला दोन कोटीचा निधी घ्या, पण पुरेसा लससाठा द्या,‘ अशी मागणीही यावेळी केली.

आमदार आवाडे म्हणाले, आयजीएम रुग्णालयात लहान मुलांच्या आयसीयुसाठी 20 लाख दिले. पण अद्याप रुग्णालय प्रशासनाकडून त्याबाबतचा निर्णयच घेतलेला नाही. रुग्णालयात आणखी 2 व्हेंटीलेटर बेड वाढले असून 22 व्हेंटीलेटर बेडचे आयसीयु होणार आहे. जवाहर साखर कारखान्याच्या माध्यमातून 25 एनआयव्ही मशिन दहा लिटरच्या ऑक्सीजन जनरेटरसह देणार आहे. त्यातील दहा युनिट लहान मुलांसाठी दिले जाणार आहेत. लहान मुलांच्या आयसीयुसाठी शहरातील डॉक्टरांची मदत घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. बेड क्षमता 300 करणारच

रुग्णालय इमारत बांधकामासाठी 12 कोटी 50 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. यातून तिसरा मजला बांधण्यात येणार आहे. हे रुग्णालय 300 बेडचे करण्याची मागणी आहे. पण हे रुग्णालय 250 बेडचे करण्याची मागणी मुंबईत जावून कांहीजण करीत आहेत. कारण 300 बेड क्षमता झाल्यास आपण मेडीकल कॉलेज करण्याची भिती त्यांना आहे. पण त्यांचा विरोध मोडून आपण ‘आयजीएम‘ 300 बेडचे करणारच, असे आव्हान आवाडे यांनी यावेळी दिले.

श्रेयवाद करण्याचा प्रयत्न

रुग्णालयातील 96 रिक्त पदे भरण्यासाठी व त्यामध्ये ‘त्या‘ 42 जणांना सामावून घेण्यासाठी आपण पाठपुरावा करीत आहे. पण दुसर्‍याच मागण्या करुन मूळ विषय बाजूला ठेवला जात आहे. यातून श्रेयवाद करण्याचा प्रयत्न कांहीजणांचा सुरु आहे, अशी टिका आमदार आवाडे यांनी केली.

अजितदादांना भेटणार

उपमुख्यमंत्री अजितदाद पवार कोल्हापूर जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. सर्व प्रलंबीत प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी त्यांना भेटणार आहे. त्यांच्याकडून न्याय मिळेल, अशी आशा असल्याचे आमदार आवाडे यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT