CPR hospital now only treats corona patients 
कोल्हापूर

सीपीआर रुग्णालय आता फक्त कोरोना रुग्णांवर उपचाराकरिता ; अन्य उपचार इतरत्र वर्ग

शिवाजी यादव

कोल्हापूर - सीपीआर रुग्णालयात कोरोना व्यतिरिक्त अन्य आजारातील रुग्णावरील उपचार हे इतरत्र वर्ग करून सीपीआर रुग्णालय हे पूर्ण वेळ फक्त कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात यावे असे आदेश राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधिष्ठाता डॉ आरती घोरपडे यांनी आज काढले.

जिल्हाधिकारी यांनी काल सीपीआर रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. गेल्या आठ दिवसात दिवसा गणिक कोरोना ग्रस्तांची संख्या वाढते आहे. अशात अनेक रुग्ण सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल होतात. त्यांना बेड व उपचार पूर्वक यंत्रणा अपुरी पडेल अशी स्थिती आहे. कारण सध्या सीपीआरमध्ये कोरोना बरोबरच कोरोना व्यतिरिक्त अन्य आजाराचे रुग्ण ही उपचार होत आहेत. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या नव्या रुग्णांसाठी जागा अपुरी पडते, बेड ही कमी पडत आहेत.

त्यामुळे कोरोना व्यतिरिक्त अन्य आजारावर सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांना उपचार पूर्ण होताच डिस्चार्ज दिला जाणार आहे. त्या रिकाम्या झालेल्या जागा, बेड कोरोना उपचारासाठी वापरले जातील. त्यानुसार सीपीआरमध्ये यापुढे फक्त कोरोना रुग्णांवर प्राधान्याने उपचार केले जातील. तसेच सीपीआरमधील वैद्यकीय उपचार पूरक मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात वापरले जाणार आहे.

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : माता न् तू वैरिणी ! आईनेच एक महिन्याच्या चिमुकलीला तलावात बुडवले अन्...

Latest Marathi News Updates : उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी

Beed Crime: मद्यधुंद चालक-वाहकांनी दामटली बस; बीडजवळ प्रकार उघडकीस, प्रवाशांची घाबरगुंडी, गुन्हा नोंद

Paithan Pandharpur Road: पैठण-पंढरपूर पालखी मार्गाचे काम रखडले; अवमान याचिकेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला नोटीस

ULFA(I) claim Indian Army drone strike: ! भारतीय लष्कराने म्यानमार सीमेवर ड्रोन हल्ले केल्याचा दहशतवादी संघटना ULFA(I)चा दावा!

SCROLL FOR NEXT