Craftsman in kolhapur marathi news 
कोल्हापूर

बैलाची शिंगे फोडायला चारशे रूपये तर म्हशीच्या शिंगाना तिनशे....

संजय खोचारे

पिंपळगाव - बैलांच्या बाजारात त्याला चांगलीच मागणी असते. झाडाला बांधलेल्या बैलांच्या शिंगाला तो सुबक आकार देत असतो. शेतकरी त्याला शिंगेफोड्या म्हणून ओळखतात. आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी तो आठवडाभर वेगवेगळे बाजार फिरत राहतो. कधी बेंदूर सणाच्या अगोदर तो गावोगाव भटकंती करून अनेक खिलारी बैलांना अधिक देखणे बनवतो. हातात ठोकणी, पातळी, पॉलिश पेपर, घोळण्याचे धारदार विशिष्ट हत्यार या वस्तू पाठीवर घेऊन त्यांची भटकंती सुरू राहते.

मारक्‍या बैलाच्या शिगावर काम करणे धोकादायक

बैलजोडीची शिंगे फोडणे चारशे ते पाचशे रुपये, एका म्हैशीची शिंगे फोडणे, तीनशे पन्नास ते चारशे रुपये अशा दराने हे काम बाजारावर सुरू असते. हे काम कलाकुसरीचे असते. काहिवेळा मारक्‍या बैलाच्या शिगावर काम करणे धोकादायक ठरु शकते. मात्र, हे परंपरागर शिंगंफोडे व्यापारी अत्यंत सावधपणे हे काम करतात. बैलाच्या शिंगाला कोणतीही दुखापत होऊ न देता या लोकांचे हे काम सुरू असते.

शिगंफोडे म्हणून काम करणारे कारागीर कोल्हापूर जिल्ह्यात मुरगूड, गडहिंग्लज, आजरा, कर्नाटकातील संकेश्‍वर येथील आठवडी बाजारात भेटतात. बैलांच्या वाढलेल्या नख्या कापणे, शिंगाना सुबक आकार देणे अशी कामे हे कारागीर अल्पावधीत सुबकपणे पूर्ण करतात.
शिंगे घोळल्याने जनावराचे वय तरुण वाटते असा व्यापाऱ्यांचा अनुभव आहे. शिंगे फोडण्याच्या कामात पुर्वीपेक्षा थोडी मंदी असली तरीही हे कारागीर प्रत्येक बाजार फिरुन आर्थिक मोबदला मिळविण्यासाठी राबत राहतात. औद्योगिकरणामुळे बैलांची संख्या घटत असली तरी म्हैस खरेदी-विक्री बाजार सध्या तेजीत आहे. बाजारादिवशी शिंगफोड्यांना दिवसभर काम केल्यास चांगला मोबदला मिळतो.

बैलांच्या शिंगे फोडण्याच्या कामापेक्षा म्हशींचे शिंगे फोडण्याचे काम अधिक आहे. काही वेळा जीव धोक्‍यात घालून हे कौशल्याचे काम करावे लागते. प्रत्येक बाजारात आजही हे शिंगफोडे आपले पिढीजात काम करताना आढळतात.
- पांडुरंग वरपे, बैलांचे व्यापारी, मु. पो. वर्पेवाडी (ता. भुदरगड)

जनावरांच्या बाजारात आपल्याला काम मिळावे म्हणून काही शिंगफोडे हेड्यांच्या संपर्कात राहतात. ओळखीमुळे हे काम बाजारावर मिळविणे त्यांना सोयीचे होते. पिढ्यान्‌पिढ्या हे काम करून आपली उपजीविका चालविणारे अनेक कारागीर आजही आहेत.
- मधुकर फर्जी, म्हशींचे प्रसिद्ध व्यापारी, शेळोली पैकी न्हाव्याचीवाडी (ता. भुदरगड)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मिसिंग लिंक बनला टुरिस्ट स्पॉट! फोटो काढण्यासाठी गाड्यांच्या लांबच लांब रांगा, व्हिडिओ व्हायरल; MSRDC चा प्रवाशांना इशारा

Pimpri Crime News: पिंपरीत बेकायदा गॅस रिफिलिंगचा स्फोटक धोका कायम; पोलिस कारवाईनंतरही ‘काळाबाजार’ सुरूच, जादा नफ्यासाठी जीवघेणा खेळ!

Latest Marathi News Live Update : पुण्यातील तीन तरुणांचा पवना नदीत बुडून मृत्यू,

Raigad Dhangar Shetkari News: पोटाची खळगी भरण्यासाठी मेंढपाळांची शेकडो किमीची पायपीट; वाढता उष्मा चारा पाण्याचं संकट, शिक्षणापासून वंचित पिढी..

Everest Base Camp: तन्मय नाईकने १७,४०० फूटांवर गाठले ध्येय, विरारचा ट्रेकर हिमालयात चमकला, ९ जणांतून एकटाच यशस्वी!

SCROLL FOR NEXT