Cried over the rise in onion prices; 90 per kg 
कोल्हापूर

कांदाच्या दरवाढीने रडविले; प्रतिकिलो 90 रूपये 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : परतीच्या पावसाने कांदा पिकाचे नुकसान झाल्याने बाजारात कांद्याची आवक कमी होत आहे. तर मागणी वाढली आहे. परिणामी कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली असून आज कांद्याचा किलोचा दर 90 रुपयांपर्यंत गेला. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यात या दरवाढीमुळे पाणी आणले आहे. ऐन सणासुदीच्या काळात कांद्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांतून संताप व्यक्त होत आहे. कोरोना महामारीमुळे अनेकांचे अर्थकारण कोलमडले असताना कांद्याच्या दरात झालेली वाढ ही सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी आहे. 
कोल्हापूरच्या बाजारात येणारा कांदा नगर तसेच पुणे जिल्ह्यातील कांही तालुक्‍यातून येथे येतो. पावसाने कांद्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे बाजारात या परिसरातून नवीन कांदा यायचाच बंद झाला आहे. 
त्यामुळे गोडाउनमध्ये असणारा जुना कांद्याच आता बाजारात उपलब्ध आहे. आज येथील शाहू मार्केट यार्ड येथे अवघ्या 25 ट्रक कांदा आला. आलेल्यापैकी 70 टक्के कांदा हा कर्नाटकात जातो. त्यामुळे कांद्याची मागणी वाढली आहे. तर मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने कांद्याचे दर वाढले आहेत. 
येथील मार्केट यार्डात दोन दिवसापूर्वी कांद्याचा भाव 62 रुपये होता. दोनच दिवसांत तो 75 रुपयांवर गेला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात आता कांद्याचे दर 90 रुपये किलोपर्यंत गेले आहेत. कमी दर्जाचा कांद्याचा दर हा 70 ते 80 रुपये आहे. 

पावसामुळे बाजारात नवीन कांद्याची आवक होण्याचे प्रमाण घटले आहे. मागणीपेक्षा कांद्याची आवक कमी झाली आहे. परिणामी कांद्याच्या दरात वाढ होत चालली आहे. 
- सचिन खांडेकर, कांद्याचे व्यापारी.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SSC & HSC : गुणपत्रक, प्रमाणपत्र आता एकच; दहावी-बारावीबाबत राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय

LSG vs DC Live: अर्जुन तेंडुलकरचे पदार्पण झाले? रिषभ पंतने जाहीर केली प्लेइंग इलेव्हन, अक्षर पटेलने जिंकला टॉस अन्...

RTE Admission : ‘आरटीई’साठी २ लाख ८८ हजार अर्ज; ऑनलाइन सोडत, प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक स्वतंत्रपणे होणार जाहीर

तब्बल १२ वर्षांनी छोट्या पडद्यावर परत येतोय झी मराठीचा नायक; नावही तेच; प्रेक्षकांनी पाहताच ओळखलं

Pune Kharadi housing scam: खराडीतील ‘व्हर्टीलास’ प्रकल्पात ९० टक्के पैसे भरूनही घरांचा ताबा नाही; संतप्त सदनिकाधारकांचे आंदोलन, आत्मदहनाचा इशारा

SCROLL FOR NEXT