crime news
crime news crime news
कोल्हापूर

इचलकरंजी - जर्मनी टोळीच्या 6 जणांवर मोका अंतर्गत कारवाई

ऋषिकेश राऊत

इचलकरंजी : येथील जर्मनी टोळीच्या सहाजणांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सर्व संशयीत हे आदित्य बळवंत महाव्दार (वय २६, रा.जवाहरनगर) आत्महत्त्या प्रकरणातील आहेत. त्यांच्यावर शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल आहे. एका महिन्यात सलग दुसऱ्या टोळीवर पोलिसांनी मोका कारवाई केली आहे.

अभिषेक इराप्पा तेरणे (वय २३, रा.दत्तनगर), सुनिल अशोक कोंडुगळे (२५, रा. विकासनगर), अनिकेत सुभाष बडवे (२३, जवाहरनगर), रवी ज्ञानदेव डोंगरे (जवाहरनगर), पवन उर्फ तेजस किशोर सरोदे (२२, जयभिमनगर), तेजस सातगोंडा कांबळे (इचलकरंजी) अशी मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या जर्मनी टोळीतील गुन्हेगारांची नावे आहेत. त्यांच्यावर पोलिस दप्तरी विविध गुन्हे नोंद आहेत.

या टोळीतील संशयितांनी आदित्य याच्याकडे १ लाखाची खंडणी मागीतली होती. तर त्याच्याकडून जबरीने २५ हजार रुपये व सोन्याची अंगठी काढून घेतली होती. आणखी २५ हजारांची खंडणीची मागणी करुन त्याला कुटुंबासह मारण्याची धमकी या टोळीकडून देण्यात आली होती. त्यांच्या या त्रासाला कंटाळून आदित्यने ७ नोव्हेंबररोजी राहत्या घरी गळफास घवून आत्महत्या केली होती. त्याची सुसाईट नोट पोलिसांच्या हाती लागली होती. त्यानुसार आदित्यच्या आईच्या तक्रारीनंतर संशयितांवर गुन्हा नोंद केला होता.

या गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली असून सर्वजण कारागृहात आहेत. या टोळीवर पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्फत विषेश पोलिस महानिरिक्षकांकडे मोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. त्याला आज मंजुरी देण्यात आली. यापूर्वीही या टोळीवर दोन वेळा मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या टोळीने अन्य म्होरके सध्याक कारागृहात आहेत. या बाबतची कारवाई पोलिस अधिक्षक बलकवडे, अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड, उप अधिक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक श्रीकांत पिंगळे, प्रकाश गायकवाड, सपोनी भालचंद्र देशमुख, पोलिस नाईक सागर चौगलु, काॅन्स्टेबल महेश पाटील यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Latest Marathi News Live Update : रविवारी मध्यरेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !

SCROLL FOR NEXT