फसवणूक
फसवणूक esakal
कोल्हापूर

काजू उद्योगासह विविध आमिषे दाखवून वृद्धेची 67 लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

शकुंतला आणि नीता यांची कोल्हापूर-मुंबई प्रवासादरम्यान डिसेंबर २०१९ मध्ये ओळख झाली.

कोल्हापूर - तुम्हाला काजू प्रक्रिया उद्योगासाठी परवाने काढून देतो, बहिणीच्या जावयाला कारागृहातून बाहेर काढतो, अशी आमिषे दाखवून शकुंतला चंद्रकांत शिंदे (वय ६५, रा. ताराबाई पार्क) आणि दिलीप पांडुरंग सूर्यवंशी यांची ६६ लाख ७४ हजार ३१४ रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला. शकुंतला यांच्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलिस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी नीता आणि अनिल पारकर या दांपत्यासह त्यांचा चालक सुहास आंबरे, पूजा राऊत (सर्व रा. रेवदांडा, जि. अलिबाग) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः या चौघांनी शकुंतला आणि दिलीप सूर्यवंशी यांच्याकडून वेळोवेळी ५९ लाख ९४ हजार ३१५ रुपये रोख आणि सहा लाख ८० हजार रुपये किमतीचे १७ तोळे सोन्याचे दागिने काढून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शकुंतला आणि नीता यांची कोल्हापूर-मुंबई प्रवासादरम्यान डिसेंबर २०१९ मध्ये ओळख झाली. नीता हिने त्यांच्याशी ओळख वाढवून कोल्हापुरातील त्यांच्या घरी येणे-जाणे सुरू ठेवले. तुम्हाला काजू प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी जे परवाने लागतात, ते मिळवून देते, तुमच्या बहिणीचे जावई कारागृहात आहेत, त्यांना सोडवून आणते, असे सांगून नीताने त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले. हा सर्व व्यवहार १३ मार्च २०२० ते २५ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत झाला. नीता हिने बेअरर चेकद्वारे रक्कम घेतली. तसेच, तिचा चालक सुहास आंबरे याच्याबरोबर जाऊन शकुंतला यांच्या घरातून रोख रक्कमही घेतली.

शकुंतला यांचे १७ तोळे सोन्याचे दागिने नीताने बँकेतून काढण्यास सांगितले व ते ताब्यात घेतले. शकुंतला यांचा मुलगा श्रीकांत आणि सचिन यांच्याकडून त्यांच्या खात्यातील पैसे पती अनिल आणि पूजा यांच्या खात्यावर जमा करून घेतले. शकुंतला यांच्या कौटुंबिक परिचयाचे दिलीप सूर्यवंशी यांच्याकडूनही नीता हिने पैसे खात्यावर जमा करून घेतले. या तिघांकडून आपल्या खात्यात जमा करून घेतलेली रक्कम ही ५९ लाख ९४ हजार ३१४ रुपये इतकी आहे. दागिने आणि रोख रक्कम मिळून ६६ लाख ७४ हजार ३१४ रुपये इतकी रक्कम नीता आणि तिच्या साथीदारांनी उकळली. अखेर शकुंतला यांनी नीता आणि तिच्या साथीदारांविरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT