crime case in kodoli kolhapur two boys drown in well and dead 
कोल्हापूर

कुटुंबाच्या आक्रोशाने मन हेलावले; कोडोलीत दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू

विश्वास साळोखे

कोडोली (कोल्हापूर) : रंगपंचमी खेळून पोहायला विहिरीत गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्य झाला आहे. शिवराज कृष्णात साळोखे (वय १४) व शुभम लक्ष्मण पाथरवट (वय १५)  (रा. वैभव नगर कोडोली ता. पन्हाळा) अशी या दोघांची नावे आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, वैभव नगर येथील शाळकरी चार ते पाच मुले रंगपंचमी खेळून जवळच असलेल्या बामनांचा माळा येथील गजानन कापरे यांच्या विहिरीत सकाळी दहाच्या सुमारास पोहण्यास गेली होती. त्यावेळी विहिरीत सुमारे तीस ते चाळीस फूट पाणी होते. पोहताना शिवराज व शुभम हे पाण्यात बुडू लागले. हे पाहताच सोबत आलेल्या मुलांनी ही घटना घरात सांगितली. घरचे व शेजारी तात्काळ विहिरी जवळ गेले असता त्यांना विहिरी शेजारी दोघांच्या चपला, कपडे असल्याचे लक्षात आले. पण दोघे पाण्यात दिसत नव्हते. त्यांनी आरडा ओरड केल्याने नागरिक तेथे जमा झाले. स्थानिक नागरिकांनी पाण्यात उडी मारून मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ते सापडले नाहीत. 

दुपारी अडीचच्या सुमारास कोल्हापूर व्हाईट आर्मीचे निखिल लंबू व अजिंक्य सातपुते तसेच गनिमी कावाचे प्रदीप पाटील, प्रवीण पाटील, शरद भोसले, सागर मोरे तसेच स्थानिक नागरिक शशिकांत नलवडे, नथुराम तेली, संतोष निपाणिकर, संदीप सांगलेकर, शैलेंद्र सांगलेकर, सुहास जगताप, बाळू जंटली यांच्या प्रयत्नाने गळाच्या साहाय्याने दुपारी पावणे तीनच्या सुमारास शुभम याचा तर तीनच्या सुमारास शिवराज याचा मृतदेह बाहेर काढण्यात त्यांना यश आले.  

या ठिकाणी कोडोलीचे मंडल अधिकारी अभिजित पवार व तलाठी अनिल पोवार, कोतवाल सिराज आंबी, उपसरपंच निखिल पाटील, ग्रामपंचायत सदस्य माणिक मोरे, बाजीराव केकरे, कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश काशिद उपस्थित होते. कोडोली उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनास्थळी नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावणार होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT